November 21, 2024 11:51 am

महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अमळनेरात विचारांची जयंती होणार साजरी..

अपनी भाषा में पढ़े! Translate

महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अमळनेरात विचारांची जयंती होणार साजरी..

ज्या महामानवांनी आपल्यासाठी जीवन खर्ची केले त्यांची जयंती साजरी करण्यासाठी आपल्या मीटिंग घ्यावी लागते हे दुर्दैव.. डी वाय एस पी सुनील जी नंदवाडकर.

अमळनेर : विक्की जाधव.

११ एप्रिल रोजी महात्मा फुले आणि १४ एप्रिल ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुष्पगुच्छ आणण्याऐवजी एक वही एक पेन’ या महापुरुषांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी शिक्षणाचे महत्वाच ओळखून पुष्पगुच्छ आणण्याऐवजी एक वही एक पेन’ आणण्याचे आवाहन डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेतर्फे करण्यात आले आहे.

यावेळी बोलताना अंमळनेर पोलीस स्टेशनचे डी वाय एस पी सुनील नंदवाडकर म्हणाले की माझ्या 35 वर्षाच्या अनुभवात अमळनेर असा उपक्रम राबवणारे पहिले शहर आहे. आणि हा इतिहास होणार.

 दरवर्षी याच प्रकारे महापुरुषांची विचारांची जयंती साजरी होत असेल तर शंभर वही शंभर पेन’ अमळनेर पोलीस स्टेशन तर्फे देण्यात येतील यावेळी बोलताना ते म्हणाले की आपले सण आपण शांततेत आणि कायदा सुव्यवस्थेची जाण ठेवता आचारसंहितेचे पालन करून साजरी करा. 

विविध क्षेत्रातील नागरिक अभिवादन करण्यासाठी मेणबत्ती, पुष्पगुच्छ, फुल, हार इ. खर्च करत असतात. त्यापेक्षा नागरिकांनी अभिवादनासाठी एक वही व एक पेन आणल्यास गरीब व गरजू विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होईल आणि शिक्षणाचे महत्व ही घडेल. असे नंदवाडकर म्हणाले.

यावेळी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी तुषार नेरकर, तहसीलदार रुपेश सुराणा, प्रांताधिकारी महादेव खेडकर, अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास देवरे, पोलीस कर्मचारी उत्सव समितीतील कार्यकर्ते परिसरातील नागरिक उपस्थित होते.

न. प. कर्मचारी पतपेढीत डॉ. आंबेडकर अध्ययन केंद्रातर्फे १० एप्रिल रोजी सकाळी खुली सामान्यज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!