आलेगाव धुमाळवस्ती, दौड येथे पहाटेच्या वेळी चोरी.
चोरांची वाढली डेअरिंग.
प्रतिनिधी – विकी ओहोळ
दौंड – आलेगाव येथील धुमाळवस्ती मध्ये
05/04/2024 रोजी पहाटे अंदाजे 02.45 वा. च्या सुमारास घरातील माणसे राहत्या घराचा दरवाजा उघडा ठेऊन झोपले असल्याने चोरटय़ांनी त्याचा फायदा घेऊन दरवाज्यातून घरात प्रवेश करून घरातील कपाटा मधील लॉकर मधील अंदाजे एकुण 68,000/- रू किमतीचे सोने व रोख रक्कम चोरी केली पोलिसांनी त्या अज्ञात चोरटय़ां विरोधात तक्रार नोंदविली असुन वरील वर्णनाचा माल मिळाल्यास मी तो ओळखेन व त्या अज्ञात इसमाना पाहिल्यास मी त्यांना ओळखेन अशी माहिती सुनिल रामचंद्र धुमाळ यांनी दिली असल्याचे दौंड पोलिसांनी माहीती दिली.