June 29, 2025 5:01 am

 पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय डोके यांनी केली अवैध दारू धंद्यांवर कारवाई

अपनी भाषा में पढ़े! Translate

 पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय डोके यांनी केली अवैध दारू धंद्यांवर कारवाई. बोरिबेल येथे अवैध दारू भट्टीवर दौंड पोलिसांचा छापा.

प्रतिनिधी- विकी ओहोळ
दौंड — दि 05/04/2024 रोजी सकाळी संतोष डोके यांनी मिळालेल्या माहिती नुसार मौजे बोरिबेल गावचे हद्दीत कॅनॉल चे कडेला असले ओढ्यात मनोज चव्हाण हा अवैध दारू भट्टी काढत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस उप निरीक्षक शहाजी गोसावी यांना दोन पंच बोलवून सकाळी 08.30 वा चे सुमारास छापा टाकला असता सदर ठिकाणी प्रत्येकी 200 लिटर चे 3 कच्चे रसायन चे ब्यालर त्यात एकूण 600 लिटर कच्चे रसायन त्याची किंमत अंदाजे 21,000/- तसेच तयार हातभट्टी दारू 15 लिटर त्याची किंमत 1500 रु,दारू गाळण्यासाठीचा एक लोखंडी ब्यारेल किंमत 1000 रु, दारू काढण्यासाठी लागणार चाटु किंमत 50 रु, असा एकूण 23,550 रु चा मुद्देमाल मिळून आला असून, सदर ठिकाणी मिळून आलेले कच्चे रसायन दोन पंचासमक्ष जागीच नष्ट करण्यात आले तसेच तयार हातभट्टी 15 लिटर दारू जप्त करण्यात आली व दारू भट्टी काढणारा मनोज चव्हाण रा- बोरिबेल ता.दौंड,याच्या विरोधात भा द वी स कलम 328 सह दारू बंदी अधिनियम कलम 65(ख)(ग) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.
वरील कारवाई मा.पोलीस अधीक्षक पंकज देशमुख,अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव,उ.वि.पो.अ स्वप्नील जाधव यांचे मार्गदर्शनाखाली दौंड चे पोलीस निरीक्षक संतोष डोके, पोलीस उप निरीक्षक शहाजी गोसावी,सहायक फौजदार संतोष शिंदे,पो.हवा लोहार यांनी केली गुन्ह्याचा पुढील तपास पो.हवा महेंद्र लोहार करीत आहेत अशी माहिती मिळाली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!