आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त बेस्ट आर्टिस्ट अवार्ड ने पिंपरी चिंचवड ची रेश्मा पितांबर विभूते सन्मानित
प्रतिनिधी भगवान लोंढे
महाराष्ट्र ब्युटिशियन क्लब मुंबई आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नुकतेच शो २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. या शोमध्ये पिंपरी चिंचवड (नवी सांगवी) येथील रेश्मा पिंताबर विभुते यांना ‘बेस्ट मेकअप आर्टिस्ट अवॉर्ड’ ने सन्मानित करण्यात आल्याने परिसरातून अभिनंदन होत आहे.
नवी मुंबई वाशी येथील महात्मा फुले स्मृती भवन मध्ये नुकतेच महाराष्ट्र ब्युटिशन क्लब , मुंबई आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अवॉर्ड शो २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील अनेक भागातून मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. दरम्यान बेस्ट मेकअप आर्टिस्ट अवॉर्ड २०२३ साठीचा अभिनेत्री अमृता धोंगडे व महाराष्ट्र क्लबचे विजय तालोली यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड सांगवी येथील रेश्मा पिंताबर विभुते यांचा ट्रॉफी व सर्टिफिकेट देऊन उचित असा सन्मान करण्यात आला.यावेळी सेलिब्रिटी आर्टिस्ट नीलिमा पंडित ,आयबीएस फोटोग्राफी टीम परिमल पंडित यासह अन्य मान्यवरांसह वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यातून ब्युटीशियन आणि मेकअप आर्टिस्ट सह सुमारे दोनशे महिला उपस्थित होत्या. दरम्यान विभुते यांच्या या सन्मानाबद्दल नगरसेविका श्वेता गलांडे , महिला मंच्याच्या अश्विनी झगडे यांनी अभिनंदन केले.