June 30, 2025 11:35 pm

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी आणि आशा स्वयंसेविका यांच्या उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली संपन्न.

अपनी भाषा में पढ़े! Translate

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी आणि आशा स्वयंसेविका यांच्या उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली संपन्न.

अमळनेर : विक्की जाधव.

विधानसभा मतदार संघातील पोलिस पाटील

अंगणवाडीसेविका, आशा स्वयंसेविका यांच्या स्वतंत्र बैठका उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली ग स हायस्कूल मध्ये घेण्यात आल्या.

लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे,

कोणीही मतदानपासून वंचित राहू नये, आचार संहितेचे

काटेकोर पालन होण्यासाठी प्रशासन जातीने दखल घेत

आहे. त्यात नुकत्याच प्रसूत महिलांच्या बाळासाठी मतदान

केंद्राशेजारी पाळणाघर असेल त्यांची आणि गर्भवती

महिलांची माहिती घेऊन अशा महिलांना मतदान केंद्रापर्यंत

आणून त्यांना आवश्यक मदत अंगणवाडी सेविका आणि

आशा ताईनी करावी असे आवाहन करण्यात आले. तर

पोलीस पाटलांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना खेडकर

म्हणाले की ८५ वर्षाच्या वरील वृद्ध आणि अंथरुणाला

खिळलेले लोकांची माहिती घेऊन ठेवा, आचारसंहिता

अमलबजावणीसाठी गावातील झेंडे, बॅनर्स होर्डिंग

कटाउट तातडीने काढून आचारसंहिता भंग होणार नाही

याची काळजी घ्यावी, गावात कायदा व सुव्यवस्था आणि

शांतता राखली जाईल यासाठी दक्ष असावे असेही ते

म्हणाले. या बैठकांना तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, बालविकास प्रकल्प अधिकारी प्रेमलता पाटील, पोलीस

निरीक्षक विकास देवरे, आदी उपस्थित होते

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!