राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मंत्री अनिल भाईदास पाटील यांचा समावेश..
अमळनेर : विक्की जाधव..निवडणुकीची धामधूम
सुरू झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जाहीरनामा समितीत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांच्या निवडीचे पदाधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात येत आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी महाराष्ट्र राज्यासाठी जाहीरनामा समिती जाहीर केली असुन त्यात त्यांनी मंत्री पाटील यांचा समावेश केला आहे. सदर जाहिरनामा समितीत अध्यक्षपदी ना. दिलीप वळसे
पाटील, सदस्यपदी ना. धनंजय मुंडे, ना. अनिल भाईदास पाटील, नरहरी झिरवळ, ना. कु. अदितीताई तटकरे, आ. डॉ.
राजेंद्र शिंगणे, बाबा सिद्दीकी, अविनाश आदिक, समीर
भुजबळ, रुपाली चाकणकर यासह इतरांचा समावेश
आहे.दरम्यान नामदार अनिल पाटील हे कॅबिनेट मंत्री म्हणून
राज्यभर प्रकाशझोतात आले असताना पक्ष संघटनेत
देखील ते क्रियाशील असल्याने वरिष्ठ नेत्यांमध्ये त्यांचा
समावेश होऊ लागला असून अनेक महत्त्वाच्या जवाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावर दिल्या जात आहेत.