शहरातील सराफ बाजार परिसरात राहणाऱ्या एका महिलेची ऑनलाईन फसवणूक..
अमळनेर येथील महिला मोबाईल वर आलेल्या मेसेज लिंक वर क्लिक केल्या वर कुर्ता ऑर्डर केला असता झाली सायबर क्राईम ची शिकार
अमळनेर : विक्की जाधव
कुर्ता बुकींग केलेले पार्सल घरी पोहोचण्याच्या नावाखाली बँक खात्यातून ९९ हजार ४९० रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. या संदर्भात दि. १७ मार्च रोजी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फसवणूक झालेल्या योगिता राकेश भामरे (वय ३५, रा. सराफ बाजार, अमळनेर) या महिलेने अमळनेर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. त्यांनी दि. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता मोबाईलच्या फेसबुक अकाऊंटवरून ऑनलाईन कपडे विक्री करणाऱ्या एका अकाऊंटवरून लेडीज कुर्ता घेण्याची ऑर्डर दिली होती. ती ऑर्डर २ डिसेंबरपर्यंत घरापर्यंत येणार होती. दरम्यान दिलेली ऑर्डरचे पार्सल घरी आले नाही, त्यामुळे त्यांनी गुगलवर कुरिअर ट्रॅकिंग शोध घेत मोबाईल क्रमांक मिळविला. त्यावर कॉल करून विचारणा केली असता समोरील अज्ञात व्यक्तीने काही तांत्रिक कारणामुळे पार्सल अडकल्याचे सांगून दिलेल्या एका फाईलवर क्लिक करण्याचे सांगितले क्लिक केल्यावर अकाउंट मध्ये असणारे सुमारे 99 हजार 490 रुपयां वर अज्ञातां ने डल्ला मारला असून पोलीस पुढील तपास करत आहे.