July 1, 2025 1:55 am

गाडीची बॅटरी चोरी करण्याच्या संशयावरून दोघांनी केली बेदम मारहाण…

अपनी भाषा में पढ़े! Translate

गाडीची बॅटरी चोरी करण्याच्या संशयावरून दोघांनी केली बेदम मारहाण…

अमळनेर : रिक्षाची बॅटरी चोरीबाबत संशय व्यक्त केल्याच्या रागातून एका दिव्यांगासह दोघांना लाकडी दांडा व लोखंडी सळईने मारहाण करण्यात
आली. यात दोघेही जखमी केल्याची घटना १६ रोजी रात्री साडेनऊ वाजता ताडेपुरा भागात घडली. जखमीवर दवाखान्यात उपचार सुरु असल्याने
चारजणांवर उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम प्रकाश चौधरी हा ४० टक्के अंध असून त्याची रिक्षा आहे. रिक्षाची बॅटरी चोरी गेली होती. त्याबाबत शुभमने पोलिसांजवळ विजय उर्फ बंटी कैलास धनगर याच्यावर संशय व्यक्त केला होता. त्याचा राग आल्याने १६ रोजी रात्री ९ वाजता कैलास धनगर, कैलास राजाराम धनगर, अजय कैलास धनगर, लताबाई कैलास धनगर आले व त्यांनी शिवीगाळ करून धमकी दिली. तसेच विजय याने शुभमच्या डोक्यावर,
डोळ्यावर व नाकावर लाकडी दांड्याने मारहाण करून दुखापत केली. पुढील तपास हे. कॉ. सुनील पाटील करीत आहेत.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!