सेवाभाव जीवनात असेल तर जीवन हे अमृतमय होते.. बीएपीएस स्वामीनारायण संस्थेचे कोठारी संत पूजा आनंद जीवन स्वामी
अमळनेर : विक्की जाधव..
पान खिडकी अमळनेर स्वामीनारायण सत्संग मंडळाच्या वतीने दिव्य सत्संग सभेचे आयोजन करण्यात आले होते या वेळी दिव्य सत्संग सभेला बीएपीएस स्वामीनारायण संस्थेचे खानदेश चे कोठारी संत पूजा आनंद जीवन स्वामी व पूज्य निर्दोष वदन स्वामी यांच्या सत्संग प्रवचनांचा लाभ मिळाला याप्रसंगी पूजा आनंद जीवन स्वामींनी जीवन कसे जगावे, व्यसनांमुळे मानवाचे होणारे नुकसान तसेच विनाकारण होणारा खर्च व बचतीचे महत्त्व समजावून सांगितले तसेच परमेश्वरावरती दृढ श्रद्धा असली तर आपले सगळे मार्ग सुकर होतात व सेवाभाव जीवनात असेल तर जीवन हे अमृतमय होते असे विचार मांडले त्याचबरोबर अबुधाबी येथे तयार झालेल्या बीएपीएस स्वामीनारायण हिंदू मंदिराचे महत्त्व देखील स्वामींनी आपल्या प्रवचनातून मांडले याप्रसंगी पूज्य निर्दोष वजन स्वामी यांनी आपल्या जीवनात गुरूंचे महत्त्व अपार आहे जो भगवंताच्या आश्रयाला राहतो त्याची काळजी भगवंत घेतोच हे विचार मांडले.
सदर सत्संग सभा यशस्वी होण्यासाठी व पूज्य निर्दोष वदन स्वामी यांच्या आशीर्वाद तसेच पान खिडकी बीएपीएस स्वामीनारायण सत्संग मंडळ अमळनेर व बीएपीएस स्वामीनारायण सत्संग मंडळ अमळनेर च्या पान खिडकी परिसरातील सर्व कार्यकारांनी अथक प्रयत्न केले. परमभक्त रमेश भाई कुंभार, योगेश चौधरी, मुकेश पाटील, प्रवीण चौधरी, उमेश भावसार आदी कार्यकर्त्यांनी तसेच युवक मंडळाने ही दिव्य सभा यशस्वी होण्यासाठी सेवाभाव राखत आपली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण केली. मनोज पाटील पवन वर्मा, बागड सर यांचेही सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते.