झोपडीला आग लागल्याने 12 शेळ्यांचा मृत्यू उदरनिर्वाह करणारे कुटुंब उघड्यावर…
अमळनेर: तालुक्यातील झाडी येथे पहाटे सुमारास झोपडीला अचानक आग लागली. त्यात 12 शेळ्यांचा जळून मृत्यू झाला तर आठ शेळ्या गंभीर भाजल्या आहेत. शिवदास यादव भिल यांच्या मालकीच्या या शेळ्या होत्या. घराच्या मागील बाजूस असलेल्या झोपडीत बकऱ्या बांधलेल्या होत्या. पहाटे अडीच वाजेच्या सुमारास आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
आरडाओरडा करून आजूबाजूच्या नागरिकांना बोलावले. अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना घटना कळताच त्यांनी अग्निशमन
बंब पाठवला. तसेच गावकरी योगेश बागुल, शुभम भिल, अशोक पवार, विजय भिल यांनी आग विझवली. मात्र तोपर्यंत उशिर झाला होता. तब्बल 12 शेळ्यांचा मृत्यू झाला होता. शेळ्यांवरच उदरनिर्वाह असल्याने शिवदास भिल यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे.
सादर घटनेची मारवड पोलीस स्टेशनला नोंद झाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत