June 29, 2025 12:42 pm

करमाळा तालुक्यातून तब्बल ५० गाडयांचा ताफा मुंबईतील युवा सेनेच्या मेळाव्यासाठी जाणार- निखिल चांदगुडे, युवा सेना जिल्हा समन्वयक

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- करमाळ्यात युवासेनेची बैठक झाली. २४ तारखेला मुबंईत होणाऱ्या युवासेनेच्या राज्यस्तरीय मेळावाचे नियोजन झाले.करमाळा तालुक्यातून तब्बल ५० गाडयांचा ताफा मेळाव्यासाठी जाणार आहे व तसेच पूर्ण सोलापूर जिल्ह्यातून युवसैनिक जाणार आहेत.
मा.खा.श्रीकांत शिंदे यांचा मार्गदर्शनाखाली व कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक,सचिव किरण साळी,सचिव दीपेश म्हात्रे, सचिव ऋतुराज क्षिरसागर यांचा अध्यक्षतेखाली हा महामेळावा संपन्न हणार असल्याची माहिती युवासेना जिल्हासमन्वयक निखिल चांदगुडे यांनी दिली.
बैठकीत आगामी काळातील निवडणुका संदर्भात सविस्तर चर्चा झाली व पक्षवाढीचे नियोजन आखण्यात आले.
कार्यक्रमात युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे,निखिल चांदगुडे,विशाल गायकवाड,नवनाथ गुंड,राहुल कानगुडे,निलेश मद्दे,संतोष सोरटे,आदित्य जाधव,अजिनाथ भोसले,सुनील पवार,भैय्या बरडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!