दाऊद उर्फ शुभम देशमुख याचा एकावर चाकू हल्ला ..
शहरातील कुख्यात गुन्हेगार दाऊद उर्फ शुभम देशमुख याने एकावर चाकू हल्ला करत जबर जखमी केल्याची घटना काल सायंकाळी उशिरा घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील ढेकु रोड भागात राहणारा जयवंत पाटील व सराईत गुन्हेगार दाऊद उर्फ शुभम देशमुख यांच्यात किरकोळ वाद
झाल्याने शुभम देशमुख याने जयवंत यांच्या पोटावर दोन ठिकाणी चाकूने वार करत जबर जखमी केले. जयवंत यास अमळनेर येथे खाजगी रुग्णालयात प्राथमिक
उपचार करून धुळे येथे रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीसात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.