साने गुरूजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान च्या वतीने 19 फेब्रुवारी रोजी अखंड भारताचे दैवत श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांची नांदगाव येथे जयंती साजरी करण्यात आली.
अमळनेर: विक्की जाधव..
साने गुरूजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान च्या वतीने 19 फेब्रुवारी रोजी अखंड भारताचे दैवत श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. जयंती निमित्ताने नंदगाव ता. अमलनेर येथील महेंद्र भाऊ महाजन यांनी 100 पुस्तक तिथल्या तरुणांना भेट दिली, तर नंदगाव चे तरूण सरपंच दामोदर भाऊ यांनी शिवाजी महाराजांच्या विचार डोक्यात घ्या अभ्यास करा. द्वेष भावना ठेऊ नका ही भावना व्यक्त करत आपल्या भावना व्यक्त केल्या दर्शना ताई पवार यांनी युवा सोबत संवाद साधत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त युद्ध नाही तर नव्या व्यवस्थेचा आग्रह , छत्रपती शिवाजी महाराजांची शेती विषयक धोरण , महसूल खाते , छत्रपती शिवाजी महाराजांचा महीलांविषयक दृष्टीकोन, या विषयावर संवाद साधला. यावेळी नंदगाव ग्रामस्थ तरुण-तरुणी, वृद्ध, आणि विवेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.