July 1, 2025 1:24 pm

शून्यातून विश्व निर्माण करणारे शेखर पवार यांना रोटरी वोकेशनल एक्सलन्स अवॉर्ड ने सन्मानित

अपनी भाषा में पढ़े! Translate

शून्यातून विश्व निर्माण करणारे शेखर पवार यांना रोटरी वोकेशनल एक्सलन्स अवॉर्ड ने सन्मानित

(निलेश गायकवाड )

रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 व भिगवन रोटरी क्लब यांच्या वतीने देण्यात येणारा रोटरी एक्सलन्स अवार्ड हा भिगवन येतील प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक श्री शेखर देविदास पवार यांना सन्मानित करण्यात आले. श्री शेखर पवार हे अतिशय गरीब कुटुंबातील व्यक्तिमत्व त्यांनी ज्या चहाच्या टपरी मध्ये कामाला राहिले ती चहाची टपरी मालक श्री विजय पुजारी यांनी शेखर पवार यांना चालवायला दिली आणि श्री पवार यांनी अपार कष्ट जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हॉटेल ज्योती मिसळ या नावाने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये मिसळ फेमस केली आणि त्या माध्यमातून भिगवन चे नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजवले हॉटेल ज्योती मिसळ सोबतच त्यांनी ज्योती व्हेज ,ताराई मंगल कार्यालय असे वेगवेगळे व्यवसाय केले समाजाने त्यांना भरपूर दिले याचे भान ठेवून त्यांनी भिगवन व पंचक्रोशी मध्ये गोरगरिबांना मदत करणे, स्मशानभूमी नूतनीकरण करणे भैरवनाथ मंदिराची कमान उभा करणे आपले मित्र श्री बापूराव थोरात यांना घेऊन त्या दोघांनीअंत्यविधीसाठी रथ उपलब्ध केला अशी वेगवेगळी समाज उपयोगी कार्य केले या सर्व कार्याबद्दल रोटरी क्लब ऑफ भिगवन व रोटरी क्लब ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट 3131 zone 3 यांच्यावतीने पुणे येथे त्यांना प्रांतपाल DGND रो. नितीन ढमाले, रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 च्या वोकेशनल टीम चे डायरेक्टर रो. वसंतराव माळुंजकर, को डायरेक्टर रो. शिरीष पुराणिक,AG हनुमंत पाटील,रोटरी क्लब भिगवन चे अध्यक्ष श्री रणजीत भोंगळे वोकेशनल डायरेक्टर प्रवीण वाघ , संस्थापक अध्यक्ष सचिन बोगावत यांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी नियोजित प्रांतपाल नितीन ढमाले यांनी रोटरीने विश्वातून पोलिओ निर्मूलनाचे जे काम केले आहे त्याचा आढावा घेतला व समाज कार्य करत असताना रोटरी सोबत येऊन काम करण्याचे आवाहन केले या वेळी रोटरी क्लब भिगवन चे खजिनदार कुलदीप ननवरे डायरेक्टर संजय रायसोनी, प्रदीप वाकसे , अल्ताफ शेख व योगेश चव्हाण व झोन मधील रोटरीयन्स उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!