June 29, 2025 3:31 am

हळदी कुंकू समारंभास महिलांचा उदंड प्रतिसाद;भिगवण ग्रामपंचायतीच्या वतीने उपक्रम

अपनी भाषा में पढ़े! Translate

हळदी कुंकू समारंभास महिलांचा उदंड प्रतिसाद;भिगवण ग्रामपंचायतीच्या वतीने उपक्रम

(निलेश गायकवाड)

भिगवण ता.१५ मकर संक्रांतीच्या निमित्त भिगवण ग्रामपंचायतच्यावतीने आयोजित केलेल्या हळदी कुंकू समारंभाला महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला.येथील ग्रामपंचायतीच्या प्रांगणात सायंकाळी ४ते ७ या वेळेत हा सोहळा पार पडला.
कार्यक्रमासाठी सुसज्ज,भव्य शामियाना उभारण्यात आला होता, त्यात विद्युत रोषणाई करण्यात आली होती, दीपप्रज्वलन व फटाक्यांच्या आतिषबाजीने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
या वेळी महिलांना वाण म्हणून संसरोपयोगी साहित्य देण्यात आले.त्यात सर्व वयोगटातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. महिलांनी विविध कलागुण सादर केले. त्यात जेष्ठ महिला आणि नव विवाहित महिलांच्या उखाण्यांनी रंगत आणली.यामुळे उपस्थित महिलांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.शिस्तबद्ध पद्धतीने सदरचा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी सरपंच दिपीका क्षीरसागर,उपसरपंच मुमताज शेख,तृप्ती जाधव,प्रतिमा देहाडे, स्वाती धवडे,तेजस्विनी भोसले, सोनाली वायसे,सईबाई खडके, माधुरी भाकरे,रत्नमाला रायसोनी, डॉ.जयश्री गांधी,यमुना काळे, सुचेता साळुंखे, प्राची थोरात, रेखा खाडे,वंदना थोरात,स्मिता खानावरे,मेघा शेलार,सीमा काळंगे,मीना बंडगर,रेखा क्षीरसागर,आशा चौधरी, सुषमा वाघ,कोमल पांढरे,अस्मिता क्षीरसागर,अर्चना नरुटे व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!