July 1, 2025 2:04 am

दौंड शहरातील फुटपाथने घेतला मोकळा श्वास,

अपनी भाषा में पढ़े! Translate

दौंड शहरातील फुटपाथने घेतला मोकळा श्वास,
नवे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची स्वतः रस्त्यावर उतरून अतिक्रमणांवर कारवाई.
प्रतिनिधी – विकी ओहोळ
84 46 11 91 58
दौंड :- शहरातील मुख्य बाजारपेठेत असणाऱ्या रोडलगतच्या फुटपाथवर तसेच शहरातील विविध चौकात असणाऱ्या फुटपाथवर गेल्या अनेक वर्षांपासून छोट्या-मोठ्या विक्रेत्यांनी तसेच हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याचे दिसून येत होते त्यामुळे रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत होता .
यामुळे वाहतूक कोंडी होऊन सर्वसामान्य नागरिक आणि वाहनचालकांना याचा त्रास सहन करावा लागत होता दौंड शहरात आलेले नवे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी हा उपक्रम राबवला यामध्ये ते स्वतः रस्त्यावर उतरून रस्त्याच्या कडेला असलेल्या फुटपाथवर अतिक्रमण केलेल्या व्यवसायिकांच्या अतिक्रमणावर हातोडा घातला यामध्ये पोलीस अधीक्षक पंकज देशमुख उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव तसेच नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी अतिक्रमने काढण्यासाठी सहभाग घेतला चंद्रशेखर यादव यांनी पुन्हा अतिक्रमण केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल कारवाई करण्यात येऊ नये यासाठी व्यावसायिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे देखील सांगितले
यावेळी शहरात तणावपूर्ण वातावरणनिर्माण झालेले दिसुन आले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!