प्राध्यापकांनी त्यांच्या उच्चशिक्षणाचा उपयोग केंद्र सरकारचे संशोधन प्रकल्प मिळविण्यासाठी करावा – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील
इंदापूर प्रतिनिधी भगवान लोंढे – इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने दि. ०३ व ०४ फेब्रुवारी 2024 रोजी सरकारी निधी एजन्सीकडून अनुदान मिळविल्यासाठी संशोधन प्रस्ताव लिहणे जसे की DST, DBT, ICSSR SERB, AICTE, ICMR इत्यादी या विषयावरती दोन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष ,माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले . या कार्यशाळेसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाचे सल्लागार डॉ. अनंत राम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी संशोधन, क्षेत्रामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयावरती संविस्तर मार्गदर्शन केले. तसेच सुसंस्कृत जीवन जगण्यासाठी शिक्षण हे अतिशय महत्त्वाचे आहे असे त्यांनी सांगितले.
हर्षवर्धन पाटील हे पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलपती असल्याने राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय निधी, इंडो-जपान, इंडो कोरीया निधी कसा उपलब्ध करायचा याबाबत भाष्य केले, पुढे बोलताना, ग्रामीण भागातील विद्याथ्यर्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचा अध्यक्ष या नात्याने मी कटीबध्द असल्याचे त्यांनी सांगितले
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. अनंत राम, सल्लागार विद्यापीठ अनुदान आयोग यांनी उपस्थीत प्राध्यापकांच्या गुणवत्ता व संशोधनाबाबत समाधान व्यक्त करुन ग्रामीण भागातील महाविद्यालयास मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान मिळू शकेल अशी आशा व्यक्त केली.
या दोन दिवसीय कार्यशाळेसाठी विविध महाविद्यालयातून १०० हुन अधिक प्राध्यापकांनी आपला सहभाग नोंदविला.
कार्यशाळेमधून भारत सरकारच्या विविध विभागांमध्ये एकूण 7 कोटीचे संशोधन प्रकल्प प्रस्तावित करण्यात येणार आहेत अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांनी दिली.तसेच त्यांनी आपल्याकडील राष्ट्रीय संशोधन आणि त्यावरील प्रस्ताव याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
भारत सरकारच्या ” राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या सदस्य पदी नियुक्ती झाल्याबद्दल कार्यशाळेमध्ये सहभागी सर्व प्राध्यापकांच्या वतीने हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा. डॉ. शिवाजी वीर यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. महादेव शिंदे यांनी केले.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे यांनी आभार मानले.