पुणे शहरातील अवैद्य धंदे बंद करा- नवनियुक्त पोलीस आयुक्तांचा अधिकाऱ्यांना आदेश.
निरा नरसिंहपुर :दिनांक- 4, प्रतिनिधी: डॉक्टर सिद्धार्थ सरवदे.
पुणे शहराचे नवनियुक्त पोलीस आयुक्त म्हणून अमितेश कुमार यांनी कार्यभार स्वीकारला. शुक्रवारी त्यांनी सर्व पोलीस ठाण्यातील निरीक्षकांची बैठक घेतली त्यात त्यांनी शहरातील गुन्हेगारी आणि सद्यस्थितीबाबत आढावा घेतला. सर्व अधिकाऱ्यांना गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याच्या सूचना दिल्या आहेत .खून आणि खुनाचा प्रयत्न आणि शरीरराविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगाराला कठोरातील कठोर शासन करावे .सराईत गुन्हेगारांविरुद्ध आता वेगळ्या पद्धतीने मोहीम राबवण्यात येणार आहे .शहरात पेट्रोलिंग( पोलीस गस्त) वाढवण्यात येणार असून त्याबाबत योग्य नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अवैध धंदे कुठल्याही परिस्थितीत चालू दिले जाणार नाहीत .अवैद्य धंदे पूर्णपणे नष्ट करण्याचे आदेश दिले .
पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, की “शहरातील गुन्हेगारी टोळ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांना मारहाण करून लुटणाऱ्या आणि शस्त्राने वार करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केल्या जातील. ट्राफिक बाबतीत ही लवकरच उपाययोजना केल्या जातील.