मदनवाडी येथील आबासाहेब चितळकर यांना देवगिरी शॉर्टफिल्म फेस्टिवल अंतर्गत सहभागी प्रमाणपत्राने सन्मानित
(निलेश गायकवाड)
कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आणि विवेकानंद प्रतिष्ठान पुरस्कृत खाशाबा वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल वर्ष तिसरे 27 व 28 जानेवारी 2024 जळगाव येथे पार पडले.
मदनवाडी येथील रील स्टार आबासाहेब चितळकर यांनी शॉर्ट फिल्म मध्ये उत्तम कामगिरी केल्याबद्दल देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल मध्ये त्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या वाटचालीस सर्व शॉर्ट फिल्म फेस्टिवल मधील कलाकारांनी व मदनवाडी येथील ग्रामस्थांनी कौतुक केले. व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
चितळकर यांनी बोलताना सांगितले सदर देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल चे मनापासून आभार मानले त्यांच्या या कौतुकामुळे शाबासकीची ताप मिळाल्याचे सांगितले.