शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत भैरवनाथ विद्यालयाचे यश
प्रतिनिधी:- प्रा तुषार वाबळे
महाराष्ट्र शासनाच्या कला संचलनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या सन 2023 24 चा शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा निकाल नुकताच जाहीर झाला असून, त्यामध्येरयत शिक्षण संस्थेच्या,भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भिगवण यांना उदंड यश प्राप्त झाले.या परीक्षेस विद्यालयातील इंटरमिजिएट परीक्षेसाठी एकूण 18 विद्यार्थी सहभागी झाले होते.विद्यालयाचा निकाल 100% लागला असून, त्यामध्ये कु.निकम स्नेहल गोकुळ, कु.मोटे तनुश्री अनिल कु.थोरात प्रीती मनोज ,खरात प्रज्वल अण्णासो कु.खुसपे भूमिका राजेंद्र इ.10 वी यांनी ए ग्रेड मिळवून विशेष प्राविण्य मिळवलेले आहे.त्याचप्रमाणे मतिसे तल्हा मोहसीन , दराडे किरण श्रीमंत ,खुरंगे अभिनव अर्जुन , कु. आवंतकर मानसी शहादेव यांनी बी ग्रेड मिळवून प्राविण्य मिळवलेले आहे.व इतर सर्व विद्यार्थी पात्र असून त्यांना सी ग्रेड मिळालेली आहे. अशाप्रकारे विद्यालया चा निकाल शंभर टक्के लागला आहे यांना मार्गदर्शन करणारे विद्यालयाचे कलाशिक्षक श्री ज्ञानेश्वर एस. राऊत त्याचप्रमाणे सर्व शिक्षक शिक्षिका वृंद या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ सोनवणे एस.व्ही. तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री भोसले व्ही.बी. व स्थानिक स्कूल कमिटी शाळा व्यवस्थापन समिती शाळा व्यवस्थापन व विकास समिती यातील सर्व सदस्य तसेच पालक वर्ग यांनी विद्यालयाचे कौतुक व अभिनंदन केले.