करमाळा प्रतिनिधी :- महाराष्ट्रातील शिवसेना भाजपाच्या सत्ता स्थापने नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) यांनीही शिंदे फडणवीस सरकार मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. परंतु राष्ट्रवादी अजित पवार गटाने पक्ष बांधणी साठी कंबर कसली असून सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाने पक्षांतर्गत नियुक्त्या करुन पक्षाला व कार्यकर्त्यांना बळकटी देण्याचे काम चालू केले आहे.
करमाळा शहरात सुद्धा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या करमाळा शहर अध्यक्ष पदी बाहेर तालीम छत्रपती चौक करमाळा येथील सोहेल अब्दुलकादर पठाण यांची तर शहर कार्याध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. त्याबद्दल युवा उद्योजक प्रफुल्ल शिंदे यांच्या हस्ते पठाण यांचा सन्मान करण्यात आला. तसेच रंभापूरा येथील श्रीराम (रामा) सुंदर कारंडे यांची ही सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड यांनी निवड जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली. करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या विचाराने या पुढील काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रामाणिक पणे काम करणार असल्याचे नुतन शहराध्यक्ष व कार्याध्यक्ष यांनी सांगितले. या निवडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय सोलापूर येथे जाहीर करण्यात आल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे-पाटील, उत्तमराव जानकर, कल्याणराव काळे, राजेंद्र हजारे, करमाळा तालुका अध्यक्ष भरत आवताडे, जिल्हा उपाध्यक्ष अशपाक जमादार, जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार देशमुख, युवा नेते बाप्पू तांबे यांच्यासह जिल्ह्यातील व करमाळा तालुक्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.