June 29, 2025 7:32 pm

साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात

अपनी भाषा में पढ़े! Translate

साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात

अमळनेर – साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय अमळनेर येथे माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी डॉ.विक्रांत पाटील व डॉ.प्रियंका प्रशांत शिंदे यांना शाळेत बोलवण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक प्रा.डॉ.एस.जे.शेख तर प्रमुख पाहुणे म्हणून संचालक गुणवंतराव पाटील, ॲड.अशोक बाविस्कर, भास्करराव बोरसे, किरण पाटील व मुख्याध्यापक सुनील पाटील हजर होते.
डॉ.विक्रांत पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांच्या लठ्ठपणा, मधुमेह, स्थूलता व डोळ्यांच्या आजारांबद्दल तसेच बदलत्या जीवनशैलीबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण केली. प्रतिबंधात्मक उपाय कोणते केले पाहिजे याबद्दल सविस्तर सांगितले. तसेच डॉ. प्रियंका शिंदे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांची जीवनशैली बदलली पाहिजे. चांगल्या गोष्टींचा अंगीकार करून मोबाईलचा वापर शक्य तेवढा कमी केला पाहिजे. प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी केले. सूत्रसंचालन शिक्षक डी.ए.धनगर तर आभार प्रदर्शन देवेंद्र महाजन यांनी केले. अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना प्रा.डॉ.शेख यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी आहार व झोप याचे नियोजन केले पाहिजे. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी सहकार्य केले. यावेळी शाळेतील तीनशे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. बाधित विद्यार्थ्यांना योग्य तो सल्ला देऊन पुढील मार्गदर्शनासाठी पाठवण्यात आले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!