बाल आनंद मेळाव्याने विद्यार्थ्यांना दिले व्यापाराचे ज्ञान
रत्नापिंप्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा
बाल आनंद मेळाव्यात सत्तरहून अधिक स्टॉल
दहा ते बारा हजार रुपयांची उलाढाल
रत्नापिंप्री ता. पारोळा- श्री. मयुर पाटील(प्रतिनिधी) पारोळा तालुक्यातील रत्नापिंप्री येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा घेण्यात आला विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञाना बरोबरच देवाण-घेवाण विशिष्ट व्यापाराची तसेच बचतीची आणि व्यवहाराचे ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी रत्नापिंप्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी आज बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करीत ७० ते ७५ स्टॉल लावली या स्टॉलवर प्रत्येक विद्यार्थ्याने वेगवेगळ्या मेनू तयार केलेल्या स्टॉल लावण्यात आले होते या स्टॉलमध्ये खमण, पाववडा, भजी, लाडू, मुरमुरा लाडू ,चिवडा ,बर्फी ,तिळीचे लाडू, समोसा, चहा, कुरकुरे, वेफर्स, चकली, पाणीपुरी ,भेळ, रगडा, तसेच नवनवीन वेगळ्या पद्धतीचे पदार्थ बनवून विद्यार्थ्यांनी आपापली स्टॉल उभारली होती प्रत्येक स्टॉलवर विशिष्ट प्रकारचा मेनू दिसून येत होता बाल आनंद मेळाव्याचे सकाळी साडेआठ वाजता उद्घाटन करण्यात आले मान्यवरांनी उद्घाटन करून विद्यार्थ्यांनी रांगोळी स्पर्धा देखील आयोजित केली होती आणि या रांगोळ्यांची मान्यवरांनी पाहणी करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले त्यानंतर शालेय आवारात सत्तर ते पंच्याहत्तर खवय्येगिरीचे स्टॉल प्रत्येक स्टॉलवर मान्यवरांनी तसेच रत्नापिंप्री, दबापिंप्री , होळपिंप्री येथिल ग्रामस्थांनी तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांनी हजेरी लावली याबरोबरच श्री यशवंत माध्यमिक विद्यालयाचे सर्व विद्यार्थी तसेच दबा पिंपरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी शिक्षक यांनी देखील प्रत्येक स्टॉल वर जाऊन खवयगिरीच्या आस्वाद घेतला विद्यार्थ्यांचे कौतुक करीत विद्यार्थ्यांनी स्टॉलवर देवाणघेवाणीच्या व्यवहार कशा पद्धतीने केला याबाबत कौतुक करण्यात आले यात गुंतवणूक नफा यातूनच केलेली बचत याबाबत मार्गदर्शन करण्यात आले विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट पद्धतीचे स्टॉल मांडून प्रत्येक मान्यवरांना व्यवहारिकदृष्ट्या संपर्क साधून कौतुकाची थाप मिळवली यावेळी विक्री केलेल्या मेनूचे पैशांची बचत तिची बँक देखील या स्टॉलमध्ये दिसून आले व्यवसायाची बचत बँकेत कशी करावी आणि भांडवल साठी कृपया कसा उभा करावा याचे मार्गदर्शनही या बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांना मिळाले यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष स्वप्निल मराठे ,उपाध्यक्ष महेंद्र राठोड, भिलाली केंद्र प्रमुख शरद पाटील,सरपंच वर्षा पाटील,उपसरपंच अधिकार पाटील,माजी सरपंच सुनीता पाटील,माजी उपसरपंच अंकुश भागवत ,राहुल सरदार , संदीप भिल,सुमनबाई भिल, कविता पाटील,सिमा पाटील, दिपाली मराठे, आशाबाई पाटील, ग्रामसेवक महेंद्र देसले, श्री यशवंत माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक व्हि.बी.भदाणे, पर्यवेक्षक जयश्री पाटील, विवेक गोसावी, ज्ञानेश्वर पाटील ,विनय पाटील ,एस. जे.भालेराव , भाग्यश्री वाघ, दीपमाला पाटील, भटूसिंग परदेशी ,रवींद्र पाटील ,सर्व विद्यार्थ्यी, दबापिंप्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संजीवकुमार चव्हाण, मनीषा पाटील,क्रांती पाटील,वैशाली बोरसे, रामचंद्र पाटील ,मयुर पाटील,शाळेच्या मुख्याध्यापिका मीना पाटील,सुरेखा बडगुजर, ज्योती महाजन, मनीषा भदाणे , अधिकार पाटील, योगिराज पाटील, शंकर बिरारी, अरूण पाटील,विद्यार्थ्यी, विद्यार्थ्यांनी, पालक , रत्नापिंप्री, दबापिंप्री, होळपिंप्री मोठ्या संख्येने उपस्थित होते.