June 30, 2025 9:29 am

“एक साडी तिच्यासाठी” अशीही मकरसंक्रात साजरी करत भिगवण रोटरी क्लब चा अनोखा उपक्रम

अपनी भाषा में पढ़े! Translate

“एक साडी तिच्यासाठी” अशीही मकरसंक्रात साजरी करत भिगवण रोटरी क्लब चा अनोखा उपक्रम

(निलेश गायकवाड)

रोटरी क्लब ऑफ भिगवन चा एक साडी तिच्यासाठी या प्रोजेक्ट च्या अंतर्गत मकर संक्रांतीच्या निमित्ताने भिगवण परिसरातील ऊस तोडणी कामगार महिला भगिनींना त्यांच्या कोप्यांवरतीजाऊन साडी आणि तिळगुळाचे वाटप करण्यात आले. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री रणजीत भोंगळे यांनी सांगितले की ऊस तोडणी कामगार हे आपला स्वतःच्या उदरनिर्वाह करण्यासाठी आदिवासी , बीड मराठवाडा या भागातून आलेले आहेत ते आपल्या संसार प्रपंच डोक्यावर घेऊन या ठिकाणाहून त्या ठिकाणी फिरत असतात त्यांना या मकर संक्रांतीनिमित्त साड्या देण्याचा आमच्या क्लब विचार केला व रोटरी क्लबच्या सदस्यांना आणि परिसरातील नागरिकांना साड्या देण्याचे आवाहन केले जवळजवळ तीनशे साड्या जमा झाले परंतु परिसरातील ऊस तोडणी कामगारांची संख्या पाहता 800 ते 1000 महिला या परिसरामध्ये ऊस तोडणीचे काम करत आहेत त्या सर्वांना आमचा साडी व तिळगुळ देण्याचा प्रयत्न राहणार असून समाजातील दानशूर व्यक्तींनी या योजनेबाबत सहकार्य करणे गरजेचे आहे. सदर उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे. खास करून या उपक्रमामध्ये रोटरी क्लबच्या महिला भगिनींनी साड्या देण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लबचे सदस्य भल्या पहाटे जाऊन कोपऱ्यांवरती पोहोचत आहेत.यावेळी संस्थापक अध्यक्ष श्री सचिन बोगावत, रियाज शेख, कमलेश गांधी, खजिनदार कुलदीप ननवरे पाटील, सेक्रेटरी प्रदीप ताटे, प्रवीण वाघ, उपाध्यक्ष श्री अतुल वाघ नामदेव कुदळे,किरण रायसोनी नियोजित अध्यक्ष श्री संतोष सवाने,प्रदीप वाकसे, निखिल बोगावत, संजय खाडे, दिनेश कोहनूर, संपत बंडगर तसेच डिकसळ येथील कार्यकर्ते श्री कैलास कुंभार, यशवंत चव्हाण व जांभळे साहेब उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!