मुंबईत सोने-चांदी विक्रीच्या बनावट पावत्या बनवून कर परताव्याचा दावा केल्याच्या आरोपावरून एका व्यापाऱ्याला अटक
प्रतिनिधी-अर्जुन आहेर
मुंबईत वस्तू आणि सेवा कर अधिकाऱ्यांनी एका व्यापाऱ्याला सोने-चांदी विक्रीच्या १ हजार ६५० कोटी रुपयांच्या बनावट पावत्या बनवून ४९ कोटी ७० लाख रुपयांचा कर परताव्याचा दावा केल्याच्या आरोपावरून अटक केली आहे.
या आरोपीनं कर्नाटक ज्वेलर्स, बालाजी एंटरप्राईजेस आणि किस्मत एंटरप्राईजेस यासह काही नकली तर त्याच्याशी संबंधित अनेक संस्था मुंबई, बेळगाव आणि बीकानेर या ठिकाणी कार्यरत होत्या. या व्यापाऱ्याला अटक करून अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालयात हजर करून चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.