मुंबईतील कर्ज वसुली अपीलीय न्यायाधिकरणात रिक्त पदं भरण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश
प्रतिनिधी-अर्जुन आहेर
न्यायालयीन रिक्त पदे भरण्यासाठी होत असलेल्या विलंबामुळे चिंतेत असलेल्या मुंबई उच्च न्यायालयानं केंद्राला रिक्त पदं भरण्यासाठी प्रस्तावित कालमर्यादा निश्चित करण्याचे निर्देश दिले.
उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठासमोर मुंबईतील कर्ज वसुली अपीलीय न्यायाधिकरण, अर्थात D.R.A.T.चा अध्यक्ष नियुक्त करण्यासाठी केंद्र सरकारला निर्देश देण्याची मागणी करणाऱ्या दोन रिट याचिकांवर सुनावणी सुरू होती.
बँकांना आर्थिक थकबाकी वसूल करण्यात मदत करणार्याी न्यायाधिकरणांमध्ये रिक्त पदं भरली गेली नाहीत तर अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकत नाही. न्यायालयानं केंद्र सरकारला DRAT रिक्त जागा भरण्यासाठी रोड मॅप दर्शवणारी एक टीप येत्या गुरुवारपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले.