स्व. दशरथ भगवान बर्गे यांच्या स्मरणार्थ लामजेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत स्वेटर वाटप…

अपनी भाषा में पढ़े! Translate

स्व. दशरथ भगवान बर्गे यांच्या स्मरणार्थ लामजेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत स्वेटर वाटप…
प्रतिनिधी:- प्रा. तुषार वाबळे
सामजिकतेची जाणीव उराशी बाळगून स्व. दशरथ भगवान बर्गे यांच्या स्मरणार्थ लामजेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना बारामती विभागाचे डी.वाय.एस.पी मा.श्री गणेश इंगळेसाहेब यांच्या हस्ते मोफत स्वेटर वाटप करण्यात आले. या विशेष कार्यक्रमाने बाल चमुमध्ये उत्साहाचे वातारण निर्माण झाले.याप्रसंगी शेटफळगढे(लामजेवाडी ) ग्रामपंचायतचे सरपंच श्री .राहुल वाबळे, माजी सरपंच सौ.शितल ताई धुमाळ, उपसरपंच श्री.सोमनाथ सवाने, बारामतीचे प्रसिद्ध वकील ॲड. विशाल बर्गे, राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलच्या जिल्हा उपाध्यक्ष ॲड. सौ.सुप्रिया बर्गे, सामाजिक कार्यकर्ते शाळा व्य.स.मा.अध्यक्ष श्री. गोपाळ धुमाळ , मा.चेअरमन हनुमान स. से.सो.लामजेवाडी राजेंद्र शेलार,शाळा.व्य.स.अध्यक्ष श्री .ज्ञानेश्वर साळुंखे पिंपरी चिंचवडचे माहिती अधिकार कार्यकर्ते वैभव तापकीर, दैनिक पुढारीचे वरिष्ठ उपसंपादक श्री.गोविंद बर्गे साहेब, श्री भागवत शेलार(सर) , श्री गणेश बर्गे ,मुख्याध्यापक जि. प. प्रा. शाळा लामजेवाडी श्री हनुमंत माने सर,उपशिक्षक श्री सुखदेव वाघमारे सर,यांच्यासह विविध मान्यवर तसेच लामजेवाडी ग्रामस्थ व संपूर्ण बर्गे परिवार उपस्थित होता.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक श्री माने सरांनी केले . तर बारामती विभागाचे DYSPश्री.गणेश इंगळे साहेब आणि ॲड.सौ.सुप्रिया ताई बर्गे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी ते म्हणाले की असेच उपक्रम नेहमी आपल्या लोकांची आठवण करून त्यांच्या स्मृतीला अभिवादन देणारे ठरतील. शेवटी उपस्थित मान्यवरांचे आणि आयोजकांचे श्री गोपाळ धुमाळ यांनी आभार मानले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!