June 30, 2025 8:50 pm

बारामती बस स्थानकास विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा निर्णय विधिमंडळात मांडावा – सागर डबरासे

अपनी भाषा में पढ़े! Translate

बारामती बस स्थानकास विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा निर्णय विधिमंडळात मांडावा – सागर डबरासे

प्रतिनिधी – विकी ओहोळ
8446119158
दौंड – नागपुर येथे चालू असलेल्या हिवाळी अधिवेशना दरम्यान बारामती बस स्थानकास विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे व ज्या जागेमध्ये सध्याचे स्थानक उभे आहे त्या जमिनी ज्यांच्या आहेत त्या भूमिपुत्रांना सदरील जागेत व्यवसायासाठी गाळे किंवा एस टी सेवेत सामावून घ्यावे या मागणीचे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा एकनाथ शिंदे यांना विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर बारामती बस स्थानक नामांतर संघर्ष कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष सागर डबरासे यांनी दिले, त्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की बारामती बस स्थानकास विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या मागणीवर लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ असे सांगण्यात आले. तसेच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर बारामती बस स्थानक नामांतर संघर्ष कृती समिती महाराष्ट्र प्रदेश चे पदाधिकारी यांच्या वरील बारामती बस स्थानकाच्या मुख्य भिंती वर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर बस स्थानक बारामती असा प्रतिमात्मक नामांतर केलेला फलक लावण्याने बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल झालेला मागे घेण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासनं दिल्याचे सांगितले अशी माहिती सागर डबरासे यांनी दिली त्या वेळी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर बारामती बस स्थानक नामांतर संघर्ष कृती समितीचे शिष्ट मंडळ उपस्थित होते.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!