पदाधिकारी,गटप्रमुख यादी प्रमुख आणि शिवदूत मेळावा
प्रतिनिधी-अर्जुन आहेर
शिवसेने चे नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार “शासन आपल्या दारी” या योजने अंतर्गत विभाग क्रमांक ७ चे सर्व पदाधिकारी, गटप्रमुख, यादी प्रमुख, शिवदूत अशा सर्वांची बैठक आयोजित करण्यात आली होती…सदर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक कॅबिनेट दर्जा मंत्री श्री दीपक सावंत, शिवसेना सचिव/प्रवक्ते मुंबई उपनगर विभागीय नेते मा श्री किरण पावसकर साहेब शिवसेना उपनेत्या मा. सौ कलाताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.. विविध योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत शिवसेनेच कार्य पोचावं हा मूळ उद्देश सदरच्या बैठकीचा होता…दरम्यान
मा. नगरसेवक , संपर्क नेते श्री विलास चावरी सौ विनाताई भागवत उत्तर मध्य मुंबई लोकसभा संपर्कप्रमुख तसेच प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते…