दौंड येथे सम्यक प्रज्ञा फाउंडेशन संस्थेच्या वतीने गायनाच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न.
प्रतिनिधी -विकी ओहोळ
84 46 11 91 58
दौंड – सम्यक प्रज्ञा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने गायनाच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला होता संस्थेचे अध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक दौंड येथील ज्येष्ठ बौद्ध विधीकार मा.साहेबराव पोळ आणि त्यांचे कुटुंबीय होते . शहरातील आंबेडकरी चळवळीतील निष्ठावाण कुटुंब म्हणुन त्यांची ओळख आहे समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करणे, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, मोफत पुस्तकांचे वाटप करणे तसेच सामाजिक उपक्रम सम्यक प्रज्ञा फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत असते पोळ यांच्या पत्नीचे निधन होऊन काही महिने ही झाले नाही तरीही आपले दुःख बाजूला सारून त्यांनी स्वतः ला सामाजिक धम्म चळवळीतून बाजूला ठेवले नाही.
अभिवादनाच्या कार्यक्रमास दौंड मधील सर्व अनुयायी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच अगरबत्ती, मेणबत्ती प्रज्वलन करण्यात आली त्यानंतर सामूहिक धम्म वंदना घेण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यात आले मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त करून भीम गीताचा कार्यक्रमाला सुरुवात झाली रात्री बारा वाजता कार्यक्रम संपल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. दिलीप पगारे यांनी केले तसेच नंदाताई मैराळ यांनी धम्म वंदना घेतली सोबत अरविंद पगारे प्रभाकर कोरे कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राध्यापक डॉ. किरण जाधव सर यांनी केले कार्यक्रमाचे कार्यवाहक म्हणून जगदीश सिद्गाने शिल्पा शिदगने व जयश्री माने यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. प्रेमसुख कटारिया मानद सचिव भीमथडी शिक्षण संस्था, वासुदेव नाना काळे पुणे जिल्हा अध्यक्ष भाजपा तसेच रवींद्र कांबळे उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र आरपीआय आठवले गट यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले कार्यक्रमाचे शेवटी साहेबराव पोळ संस्थापक अध्यक्ष सम्यक प्रज्ञा फाउंडेशन व कुणाल पोळ सचिव सम्यक प्रज्ञा फाउंडेशन तसेच सम्यक प्रज्ञा फाउंडेशन च्या वतीने आभार मानून कार्यक्रम संपल्याचे जाहीर करण्यात आले.