स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे तहसीलदारांना निवेदन…पुरवठा विभागातर्फे वितरित करण्यात येणाऱ्या स्वस्त धान्याचे शहरातील 34 रेशन दुकानदारांना जानेवारी 2022 या महिन्याचे धान्याचे नियतन प्राप्त न झाल्याने 34 रेशन दुकानांना जोडलेले पात्र जवळपास 45 हजार हजार 582 लाभार्थ्यांना अद्याप पर्यंत रेशनचे धान्य मिळालेले नाही.संबंधित लाभार्थी रेशन दुकानदारांकडे दररोज चौकशीसाठी फेऱ्या मारीत आहेत. संबंधित पात्र लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचे मिळणारे धान्य त्वरित उपलब्ध करून सदरचे धान्य वाटपासाठी मुदतवाढ मिळावी,तसेच संबंधित रेशन दुकानदारांना पुरवठा विभागाकडून धान्याची वेळेवर पोहच व्हावी अशी मागणी स्वस्त धान्य परवानाधारक दुकानदारांकडून तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष जगदीश चौधरी,सचिव गणेश निकम,खजिनदार किशोर पिंगळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.*