June 29, 2025 8:03 am

कामधेनू सेवा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष समाज भूषण डॉक्टर लक्ष्मण आसबे यांच्यातर्फे १५वी भाऊबीज साजरी.

अपनी भाषा में पढ़े! Translate

कामधेनू सेवा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष समाज भूषण डॉक्टर लक्ष्मण आसबे यांच्यातर्फे १५वी भाऊबीज साजरी.

निरा नरसिंहपूर: दिनांक- ११, प्रतिनिधी: डॉक्टर सिद्धार्थ सरवदे.
इंदापूर तालुक्यामधील सुरवड या गावांमध्ये समाजातील उपेक्षित घटक असणाऱ्या विधवा भगिनींना मान व सन्मान मिळवून देण्याचे अभिमानास्पद कार्य हे कामधेनु परिवाराचे समाज भूषण डॉक्टर लक्ष्मण आसबे हे नेहमीप्रमाणे करतात. आज ही समाजातील अनिष्ट रूढी व परंपराचा त्रास हा विधवा भगिनींना होतो आहे. या कालबाह्य रूढी-परंपरातून विधवा भगिनींना बाहेर काढण्याचे कार्य हे कामधेनू परिवार करत आहे, असे उद्गार संसदीय माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काढले.
सुरवड येथील मंगल कार्यालयामध्ये कामधेनु परिवाराच्यावतीने दीपावलीच्या पूर्वसंध्येला भाऊबीज ही दरवर्षीप्रमाणे साजरी केली जाते. या भाऊबीजेचे हे १५ वे वर्षे होते. या कार्यक्रमासाठी सोलापूर, पुणे, नगर, सातारा सांगली जिल्ह्यातून विधवा भगिनी तसेच आजी-माजी जवानांच्या पत्नी, माता आणि वीर माता व वीर पत्नी अशा सुमारे 4000 महिलांना साडीचोळी व त्यांच्या मुलांना कपडे व भोजन देण्यात आले. या कार्यक्रमासाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भरघोस आर्थिक मदत केली. प्रास्ताविक भाषणामध्ये समाज भूषण डॉक्टर लक्ष्मण असबे यांनी सांगितले की विधवा भगिनींनी जोडवे,मंगळसूत्र, कुंकू हे सौभाग्याचे अलंकार वापरावेत.पुरुषांनीही दुर्दैवाने स्वतःला कधी काही झाले तर आपल्या पत्नीने आपल्या पश्चात सौभाग्याचे लेणे वापरावे अशी प्रतिज्ञा केली पाहिजे असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन वीर पत्नी हेमलता बाबुराव साबळे यांनी केले .अध्यक्ष स्थान हे गुरुवर्य ह. भ. प .महेश महाराज माकणी यांनी भूषवले . अध्यक्षांनी हे सर्वांना मार्गदर्शन केले. तसेच शिल्पा संभाजी मारकड -शेंडगे (कृषी उपसंचालक )यांचेही भाषण झाले. कार्यक्रमांमध्ये विधवा भगिनींनी उपस्थित मान्यवरांचे औक्षण करून भाऊबीज साजरी केली .याप्रसंगी अशोकराव घोगरे, एडवोकेट मनोहर चौधरी , एडवोकेट अनिल पाटील, दूधगंगाचे उपाध्यक्ष उत्तमराव जाधव, पैलवान रावसाहेब मगर, सुरेश मेहेर, श्रीमंत ढोले, दादासाहेब घोगरे, मनोज जगदाळे, मिलिंद पाटील , बाळासाहेब घोगरे तसेच इंदापूर तालुक्यातील पशुवैद्यकीय डॉक्टर्स आणि कामधेनु परिवारातील सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी आभार हे आप्पासाहेब गाडगे यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!