परिषद प्राथ.शाळा शिरुड येथे फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ…
अमळनेर -दि.07-11-2023 रोजी जिल्हा परिषद प्राथ.शाळा शिरुड येथे फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेऊन माजी विदयार्थी दादासो.श्री. धनराज भगवान पाटील व बापुसो.श्री. विलास भगवान पाटील यांचेकडून सलग 7व्या वर्षी दिवाळीनिमित्त सर्व गोरगरीब विद्यार्थ्यांना फराळ व मिठाई, दिवाळी अभ्यास वाटप कार्यक्रम घेण्यात आला. शाळेच्या विविध उपक्रमात आतापर्यंत दोघेही बंधूंनी सुमारे दीड लाखाची मदत दिली आहे.
आपल्या मुलांचे वाढदिवसानिमित्त शाळेला भरघोस देणगी देतात,शैक्षणिक उपयुक्त साहित्य देतात. आपल्या शाळेचे, गावाचे ऋण फेडण्यासाठी आम्ही छोटासा प्रयत्न करत आहोत असे ते सांगतात. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून वडिलांचे कृपाछत्र हरवल्यावर शिक्षण घेऊन पुणे येथे स्थिरस्थावर झालेत, व मदत करत आहेत खरोखर त्यांच्या दातृत्वाला सलाम. याप्रसंगी जि.प.शाळा शिरुड शाळा व्यवस्थापन समिती मा.अध्यक्ष उपाध्यक्ष व मा.सर्व सदस्य,पालक, मुख्याध्यापक व शिक्षक बंधू-भगिनी, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.