दौंड च्या ग्रामीण भागात मोटार सायकल चोरांचा सुळसुळाट
प्रतिनिधी- विकी ओहोळ
84 46 11 91 58
दौंड – लिंगाळी ता. दौंड जि. पुणे येथील पासलकरवस्ती, ओमशांती अपार्टमेंटचे पार्कीगंमधुन दि. 04/2023 रोजी रात्रौ 11:30 वा. ते सकाळी 08:45 वा.चे दरम्यान स्वप्निल शिंदे वय 33 वर्षे हे वरील ठिकाणी कुटुंबासह राहणेस असुन विघ्नहर्ता हाँस्पीटल बोरावकेनगर दौंड येथे लँब टेक्निशीयन म्हणुन गेले 1 वर्षापासुन काम करतआहेत. त्यांची होन्डा कंपनीची सीबी ट्रिगल मो सा नंबर MH 42 AG 6811 ही गाडी चोरट्यांनी रात्रीच्यावेळी चोरी केली दुसर्या दिवशी कामावर जायचे असल्याने मोटारसायकल पार्क केले ठिकाणी पार्कींगमध्ये मोटारसायकल दिसली नाही पार्कींगमध्ये व इतर ठिकाणी शोध घेतला मिळुन न आल्याने कोणीतरी अज्ञात चोरट्याने मोटारसायकल चोरी करुन नेलेली आहे. तिचे वर्णन खालीलप्रमाणे 35,000/- रु. किं.ची एक काळे रंगांची होन्डा कंपनीची सीबी ट्रिगल मो सा नंबर MH 42 AG 6811 असा असलेली तिचा चेसी नंबर ME4KC191AF8068065 असा अज्ञात चोरट्याविरुध्द तक्रार केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दौंड पोलीस करीत आहेत.
याव्यतिरिक्त आणखी 2 ठिकाणी घराचा दरवाजा तोडून चोरी करण्यात आली आहे. यामुळे दौंड मधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.