रोटरी क्लब तर्फे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

अपनी भाषा में पढ़े! Translate

रोटरी क्लब तर्फे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

रविता कुंभार
दोंडाईचा शहर वार्ताहर

 

रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा तर्फे दादासाहेब रावल स्टेडियम दोंडाईचा येथे आयोजित भव्य नवरात्र गरबा उत्सव २०२३ या कार्यक्रमात दि.२२ ऑक्टोबर रोजी शिंदखेडा तालुक्याचे विद्यमान आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा तर्फे संपूर्ण दोंडाईचा शहरात इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंत शिकणाऱ्या सर्व  विद्यार्थ्यांसाठी भव्य निबंध स्पर्धेचे आयोजन भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दिनांक १५ ऑगस्ट २०२३ रोजी करण्यात आलेले होते.
सदर स्पर्धा दोंडाईचा येथील रोटरी इंग्लिश स्कूल येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत संपूर्ण दोंडाईचा शहरातील इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंत शिकणाऱ्या जवळ जवळ १२० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला होता.
इयत्ता ५ वी ते ८वी या लहान गटासाठी ‘आधुनिक काळातील युवा भारत’ हा विषय देण्यात आलेला होता. त्यात प्रथम क्रमांक मृण्मयी नारायण भिलाने इयत्ता ७ वी नूतन माध्यमिक विद्यालय, द्वितीय क्रमांक माहीन अब्दुल कादीर पिंजारी इयत्ता ६ वी अँग्लो उर्दू हायस्कूल, तृतीय क्रमांक सृष्टी राजेश ठाकूर इयत्ता ८ वी रोटरी इंग्लिश स्कूल या विद्यार्थ्यांनी मिळवला. त्यांना क्लब तर्फे अनुक्रमे ५०१, ३०१ आणि २०१ रुपये रोख स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.
मोठा गट इयत्ता ८ वी ते १२ वी हा होता. या गटासाठी ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात बदललेल्या भारताचे स्वरूप’ हा विषय देण्यात आलेला होता. त्यात प्रथम क्रमांक हितेश वासुदेव महाले इयत्ता १० वी दादासाहेब रावल हायस्कूल, द्वितीय क्रमांक संस्कृती छोटू बोरसे इयत्ता ९वी नूतन माध्यमिक विद्यालय, तृतीय क्रमांक प्रेरणा भरत महाजन इयत्ता १०वी गर्ल्स हायस्कूल या विद्यार्थ्यांनी पटकवला. या विद्यार्थ्यांना अनुक्रमे ५०१, ३०१, २०१ आणि स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
निबंध स्पर्धेतील खुला गट हा १८ वर्षावरील विद्यार्थी, तरुण व प्रौढ यांच्यासाठी करण्यात आलेला होता. या गटासाठी विषय ‘भारताची अखंडता आजची गरज’ हा होता. या गटातून प्रथम क्रमांक सय्यद जाकीर सय्यद उस्मान या अँग्लो उर्दू हायस्कूल मधील शिक्षकाने मिळवला. तर द्वितीय क्रमांक पिंजारी फरहाणा बी तसवर या अँग्लो उर्दू हायस्कूल मधील शिक्षिकेने पटकावला.
सदर बक्षीस वितरण समारंभाच्या कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा चे अध्यक्ष इंजि. गुलाम रसूल शेख, सचिव सतीश पाटील, इंजि.अमर इंदानी, इंजि. अनिश शाह, इंजि. हिमांशू शाह, श्रीकांत इंदानी, हर्षित पटेल, योगेश माहेश्वरी, राकेश जयस्वाल, डॉ. चेतन बच्छाव, डॉ. अविनाश मोरे, इंजि. शिवनंदन राजपूत, रितेश कवाड, पंकज कवाड, इंजि. अतुल पाटील, इंजि. शशिकांत शिंदे, डॉ. जितिन अग्रवाल, डॉ. प्रफुल्ल दुग्गड, डॉ. निलेश पवार, डॉ. हेमंत नागरे, डॉ. दिलीप पाटील, हरीश जैन, प्रा. डॉ. प्रवीण पाटील, आशिष अग्रवाल, ब्रिजेश अग्रवाल, शैलेश बोरसे इत्यादी रोटरी क्लबचे सदस्य बक्षीस वितरण समारंभास हजर होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिश शाह यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रवीण पाटील यांनी केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!