शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात नवचंडी महायाग

अपनी भाषा में पढ़े! Translate

शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात नवचंडी महायाग

नऊ जोडप्यांचा सहभाग; दिवसभर भक्तीमय वातावरण

अमळनेर :येथील श्री मंगळग्रह मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त २३ आॅक्टोबर रोजी नवचंडी महायाग झाला. सकाळी ९ ते दुपारी १२ व दुपारी २ ते सायंकाळी ६ या दोन सत्रांत झालेल्या या महायागात नऊ जोडपे सहभागी झाले होते. अतिशय चैतन्य व भक्तिमय वातावरणात हजारो भाविकांच्या साक्षीने हा महायाग झाला.
नऊ हा मंगळग्रह देवाचा शुभांक मानला जातो. या पार्श्वभूमीवर डॉ. शिबी वसिष्ठ, अयज रोडगे पाटील, अरुण वंजी नेरकर, सतीश पाटील, नितीन संजय पाटील, राहुल राजेंद्र पाटील, सुनील ठाकरे, प्रसन्नजीत प्रताप साळी आणि सुनील आत्माराम भोई या सपत्नीक नऊ मानकरींच्या साक्षीने माता मंगळेश्वरी श्री भूमिमातेची प्रतिमा सकाळी नऊ वाजता अत्यंत विलोभनीय व प्रसन्नचित्त स्वरूपात सजावट करून प्रतिष्ठापित करण्यात आली. प्रारंभी आवाहन पूजा झाली. गणपती पुण्याहवाचन मंडल, गौर्यादि मातृका मंडल, चतु:षष्ट योगिनी मंडल, वास्तु मंडल, क्षेत्रपाल मंडल, सर्वतोभद्र मंडल, सूर्यादि नवग्रह मंडल, चतुषष्टि भैरव देवता मंडल व ईशान्य रुद्र मंडल स्थापित करण्यात आले. त्यानंतर पाठांचे हवन करण्यात आले. सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास महाआरतीने महायागाचा समारोप झाला. प्रसाद भंडारी, तुषार दीक्षित, जयेंद्र वैद्य, गणेश जोशी, ऋषिकेश कुलकर्णी यांनी निरूपणासह पौरोहित्य केले. चंद्रकांत कुलकर्णी यांनी नाल वर साथसंगत केली.
मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्त अनिल अहिरराव, सेवेकरी प्रकाश मेखा, उज्वला शाह, विनोद कदम यांच्यासह मंदिरातील सेवेकरींनी महायाग यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!