June 29, 2025 10:15 pm

इतिहास विभागाच्या वतीने वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयामध्ये स्थानिक इतिहास लेखन या विषयावरती डॉ .उषा भोईटे – पवार मॅडम यांचे व्याख्यान.

अपनी भाषा में पढ़े! Translate

इतिहास विभागाच्या वतीने वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयामध्ये स्थानिक इतिहास लेखन या विषयावरती डॉ .उषा भोईटे – पवार मॅडम यांचे व्याख्यान.

प्रतिनिधी. . भगवान लोंढे .. .. . कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर येथे इतिहास लेखन आयोजित करण्यात आले होते . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हतिहास विभाग प्रमुख प्रा . विद्या गायकवाड यांनी केले . त्यांनीआपल्या भाषणामध्ये वाचनाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देत वाचन फायदे सांगीतले ‌त्याचबरोबर प्रा डॉ सुरेंद्र शिरसट यांनी आपल्या भाषणात डॉ उषा भोईटे – पवार यांचा परिचय करून दिला. त्या एक प्राथमिक शिक्षका असून त्या इतिहास विषयामध्ये सेट ,नेट व पी एच डी इथपर्यंत कसे शिक्षण घेतले याची माहिती विद्यार्थ्यांना दिली त्याबरोबर डॉ. उषा भोईटे पवार यांनी आपल्या भाषणामध्ये स्थानिक इतिहासाचे महत्त्व विद्यार्थी़ना पटवुन दिले. त्या म्हणतात जगाचा,देशाचा राज्याचा इतिहास शिकण्या अगोदर आपल्या गावचा तालुक्याचा स्थानिक इतिहास विद्यार्थ्यांनी करायला हवा व नंतर राज्याचा देशाचा व जगाचा इतिहास अभ्यासावा .तसेच विरश्री मालोजीराजे भोसले यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या इंदापूर चा स्थानिक इतिहासाबद्दल माहिती दिली.तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कला शाखा प्रमुख डॉ भिमाजी भोर होते. तसेच राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ बिराजदार , हिंदी विभाग प्रमुख डॉ पवार , प्रा. मोरे प्रा . पवार प्रा . नि़बाळकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा . नामदेव पवार यांनी तर आभारप्रदर्शन प्रा विशाल चव्हाण यांनी केले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!