मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आव्हानावरून भिगवन परिसरातून हजारो मराठा बांधव अंतरवाली सराटी येथे जाणार -राजकुमार मस्कार
संपूर्ण राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षणावरून रणकंदन माजले असताना अंतरवाली सराटी येथे सनदशीर मार्गाने मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी आंदोलन चालू केले होते सदर आंदोलनाला गालबोट लावण्यासाठी पोलिसांकडून झालेल्या लाठीमारावरून संपूर्ण राज्यांमध्ये मराठा समाजामध्ये अतिशय तीव्र भावना व्यक्त केली जात होती असे असताना मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषण सोडताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी शासनाला थोडा वेळ द्यावा म्हणजे शासनाला कायद्याच्या चौकटीत बसून समाजाला आरक्षण देता येईल असे आवाहन केले होते सदर आव्हानाला प्रतिसाद म्हणून जरांगे पाटील यांनी शासनाला चाळीस दिवसाची मुदत दिलेली होती त्यामुळे सदर 40 दिवसाची मुदत संपण्यापूर्वी 14 ऑक्टोबर 2023 रोजी अंतरवाली सराटी येथे विराट मराठा संवाद सभा मराठा समाजाच्या वतीने आयोजित केलेली आहे सदर सभेला संपूर्ण महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे भिगवन परिसरातूनही हजारो बांधव सदर सभेसाठी जाणार आहेत त्याबाबत सकल मराठा समाजाच्या वतीने राजेगाव येथे नियोजनाच्या बैठकीचे आयोजन केले होते तसेच सदर बैठकीमध्ये राजेगाव परिसरातील अनेक तरुण सहकाऱ्यांचा अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी म्हणून नियुती करण्यात आली तसेच सदर बैठकीमध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनांबाबतही माहिती परिसरातील नागरिकांना देण्यात आली सदर योजना तळागाळातील मराठा समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी बारामती सहकारी बँक नेहमी मदत करत असल्याचे अनेक मान्यवरांनी व्यक्त केले सदर मीटिंगसाठी जिल्हाध्यक्ष ॲड.पांडुरंग जगताप तालुका अध्यक्ष राजकुमार मस्कर, भिगवन शाखा अध्यक्ष छगन वाळके, नवनियुक्त जिल्हा उपाध्यक्ष भारत खराडे बारामती बँकेचे अभिषेक ढवान,राजेगाव शाखाध्यक्ष मनोज भोसले, खानवटे शाखा अध्यक्ष दत्तात्रय शेळके , ,कोशिंघर उपअध्यक्ष गोविंद कडू.स्वामी चिंचोली शाखाध्यक्ष अर्जुन मिंढे व अमोल मोरे मधुकर राजेंद्र बोद्रे नाना ढमे जामले भारत भोसले चंद्र कात मोरे शाहाजी गुणवरे सचिन मोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.