बी. के. बी. एन. नरसिंहपुर बावडा रस्त्यावरती टनु येथे अपघातामध्ये चिमुकल्याचा जागेवरच बळी.
निरा नरसिंहपुर: दिनांक- 19, प्रतिनिधी: डॉक्टर सिद्धार्थ सरवदे.
निरा नरसिंहपुर बावडा बी.के.बी.एन रोड हा अतिशय छान व सुंदर असा तयार केलेला आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या काही चुकीच्या धोरणांमुळे या रस्त्यावरील वेळोवेळी अपघात होत आहेत. या रस्त्याच्या दोन्ही बाजूने वेड्यावाकड्या बाभळी पसरल्या आहेत.त्यामुळे वाहन चालकांना पुढच्या दिशेने आलेली वाहने दिसत नाहीत. वाड्या- वस्त्यांना जोडणारे रस्ते आहेत त्यावरील स्पीड ब्रेकर नाहीत. नरसिंहपुर बावडा रोडवरील टनु या गावांमध्ये रस्त्याच्या कडेला असणारी झाडे आणि गावाला जोडणाऱ्या चौकात स्पीड ब्रेकर नसल्यामुळे टनु गावांमध्ये राहत असलेला सहावीतील श्रीराम नाथा तोरणे (वय 12 वर्ष) हा मुलगा शेजारील रस्त्याच्या पलीकडे रेशनिंगचा माल आणण्यासाठी निघाला होता. त्यावेळी समोरून बोलेरो पिकअप हा केळीचा माल भरून आला होता. ओव्हरलोड असल्यामुळे ही गाडी थांबली नाही व या मुलाला धडकली गाडी धडकल्यामुळे या मुलाचा जागेवरच मृत्यू झाला आहे.
सदर बोलेरो पिकअप चा ड्रायव्हर हा श्री. महेश बसवराज गबुरे हा लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील असून पिकप मालक हे केळीचे पुणे येथील व्यापारी आहेत. तसेच गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांनी ड्रायव्हरला अटक केलेली आहे व बोलेरो पिकअप ताब्यात घेतलेला आहे.
बहुजन ब्रिगेड महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री. संदीप मोहिते यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला एका वर्षापूर्वी स्पीड ब्रेकर संदर्भात पत्र दिलेले होते परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने याच्याकडे दुर्लक्ष केलेले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, माजी आमदार श्री. हर्षवर्धन पाटील तसेच विद्यमान आमदार श्री .दत्तात्रय भरणे यांनी स्वतः वैयक्तिक लक्ष घालून बावडा नरसिंहपुर रोड वरती वाड्या- वस्त्यांवरती व गावे यांना जोडणाऱ्या रस्त्यांवरती अतिशय उच्च व छान कॉलिटी चे स्पीड ब्रेकर बसवावेत तसेच या मार्गावरून जास्त प्रमाणात होत असणारी अवजड व अवैद्य वाहतूक, त्याचप्रमाणे ओव्हरलोड गाड्यांना आवर घालण्यासाठी बावडा नरसिंहपुर रस्त्यावरती चेक पोस्ट काढावी अशी ग्रामस्थांमधून मागणी आहे.