June 29, 2025 12:42 pm

शालेय जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल ची त्रिष्णा वाघ ला रौप्य पदक……..

अपनी भाषा में पढ़े! Translate

शालेय जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल ची त्रिष्णा वाघ ला रौप्य पदक……..

अमळनेर ;16 सप्टेंबर 2023 (शनिवार ) रोजी एरोंडल येथे आयोजित क्रीडा युवक सेवा संचनालय पुणे,जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व एरंडोल तालुका शासकीय क्रीडा समिती, गुरु हनुमान व्यायाम, क्रीडा मंडळ, छत्रपती क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित शालेय जिल्हा कुस्ती स्पर्धेत अंमळनेर तालुक्याचे प्रतिनिधित्व करत स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलच्या त्रीष्णा मनोज वाघ या विद्यार्थिनीने 46 किलो वजन गटात अंतिम फेरीपर्यंत मजल मारत रौप्य पदक हासिल केले.
जिल्हा क्रीडा अधिकारी मा.गुरुदत्त चव्हाण व एरंडोल तालुका क्रीडा समन्वयक अमोल पाटील यांच्या यांच्या हस्ते स्पर्धे ठिकाणी विजयी विद्यार्थिनी ला रौप्य पदक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी क्रीडा शिक्षक सुनील करंदीकर व योगेश पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे चेअरमन नीरज अग्रवाल, मुख्याध्यापक हेमंत कुमार देवरे उपमुख्याध्यापक विनोद अमृतकर यांनी विजयी विद्यार्थिनीचे भरभरून कौतुक केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!