June 30, 2025 9:33 am

जि.प. प्रा. शाळा पोथरे येथे आज ‘आजी आजोबा दिन ‘ साजरा

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड):-जि.प. प्रा. शाळा पोथरे येथे आज ‘आजी आजोबा दिन ‘ साजरा करण्यात आला . यावेळी आजी आजोबांची उपस्थिती लक्षणीय होती.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानस्थानी विष्णू रंदवे हे होते.
आजी – आजोबांच्या हस्ते सावित्रीमाईंच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .
तसेच उपस्थितांना गुलाब पुष्प देऊन स्वागत शाळेतील शिक्षक श्री. कालिदास जाधव, श्री.बापू रोकडे ,श्रीम. शाबिरा मिर्झा , श्रीम. स्वाती गानबोटे, श्रीम. सविता शिरसकर यांनी केले.
तर उपक्रमाचे प्रास्तविक, हा उपक्रम राबविण्यामागचा शासनाचा उद्देश आणि कुटूंबातील आजी – आजोबांचे महत्व याबाबत सविस्तर माहिती विषयशिक्षिका श्रीम. शगुफ्ता हुंडेकरी यांनी उपस्थितांना आणि विद्यार्थ्यांना करून दिली.
मुख्याध्यापक श्री . गजेंद्र गुरव यांनी या उपक्रमामधे विद्यार्थ्यांची व आजी आजोबांची भूमिका याविषयी थोडक्यात माहिती दिली .
सर्व उपस्थित आजी – आजोबांचे पूजन शाळेतील विद्यार्थ्यांनी केले. यावेळी सर्व ज्येष्ठांचे डोळे पाणावले होते. .
हा स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल सर्व आजी आजोबांनी शासनाचे व शाळेचे मनापासून आभार मानले. विद्यार्थ्यांच्या अध्ययनामधे घरच्या घरी आम्ही सर्वोतोपरी आमची भूमिका बजावू असे अभिवचन आजोबा श्री. विष्णु रंदवे व श्री .विठ्ठल शिंदे यांनी दिले.
हा उपक्रम एवढा परिणामकारक ठरला की लगेचच काही वेळात त्याची फलश्रुती दिसून आली .काही विद्यार्थी स्वप्रेरणेने बोलण्यासाठी समोर आले व आजपासून आम्ही आमच्या आजी आजोबांचा आदर राखून त्यांची तन -मन – धनाने सर्वोतोपरी सेवा करू, भविष्यात त्यांना कधीही दुखावणार नाही अशी ग्वाही दिली . यामुळे सर्व आजी आजोबांनी या विद्यार्थ्यांवर खूश होऊन स्वागत करताना स्वतःस मिळालेले गुलाबपुष्प या विद्यार्थ्यांस देऊन त्यांचा सन्मान केला.
खरंच, हा उपक्रम राबवत असताना त्या कालावधीमधे काही क्षणांपुरती का होईना शाळेत भावूक वातावरण निर्मिती झाली होती .
शेवटी सर्व उपस्थितांचे आभार विषयशिक्षक श्री. दत्तात्रय मस्तूद यांनी मानले व अध्यक्षांच्या परवानगीने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!