माजी आमदार साहेबराव दादा यांनी राजकीय त्याग केला नसता तर कदाचित माझे पुनर्वसन झाले नसते मंत्री अनिल पाटील..!
अमळनेर : विक्की जाधव..
अमळनेर शहरातील सर्व संस्था व समाजातर्फे
नागरी सत्कार समिती कडून बाजार समितीच्या आवारात मंत्री पाटील यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. मंत्री अनिल पाटील यांनी यावेळी तुम्ही सर्व आणि मा. आ. साहेबराव दादा यांनी राजकीय त्याग केला नसता तर कदाचित माझे पुनर्वसन झाले नसते. असे म्हणत सर्वांचे आभार मानले.
या वेळी जिल्हा बॅंकेचे चेरमन संजय पवार यांनी हा मंत्री अनिल दादा सर्वांचा बाप डाकू आहेत असे म्हणत चांगलीच टोले बाजी केली. यावेळी माजी आमदार स्मिता वाघ व्यासपीठावर खा उन्मेष पाटील, माजी आमदार
स्मिता वाघ, सभापती अशोक पाटील, अर्बन
बँक चेअरमन मोहन सातपुते, तिलोत्तमा पाटील
माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, विनोद पाटील जयवंतराव पाटील, ऍड ललिता पाटील, डॉ अविनाश जोशी, श्याम
अहिरे, भोजमल पाटील, मातोश्री पुष्पाबाई
पाटील, जयश्री पाटील, राजश्री पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार, बाजार समिती उपसभापती सुरेश पाटील उपस्थित होते. तसेच यावेळी माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, सभापती अशोक पाटील, ऍड ललिता पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. अमळनेर तालुका मराठा समाज, मराठा समाज महिला मंडळ, खान्देश शिक्षण मंडळ, नगरपालिका, ग्रामविकास शिक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ अमळनेर, अर्बन बॅंक, अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ, विद्रोही
साहित्य संमेलन समिती, जैन समाज, युवा परीट धोबी समाज, मुस्लिम समाज, कोळी समाज, लाडशाखीय वाणी समाज, अमळनेर स्मारक
समिती, बडगुजर समाज, आंबेडकरी समाज,
शिंपी समाज, यांच्यासह विविध समाज, संस्था
ग्रामपंचायती यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन मंगळग्रह संस्थेचे डिंगबर महाले सर यांनी केले.