माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदी उद्योजक नितिन जगताप…
.
बारामती ( सह-संपादक- संदिप आढाव)
सहकारातील अग्रेसर असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या स्विकृत संचालकपदी पणदरे येथील उद्योजक नितीन पोपटराव जगताप यांची निवड करण्यात आल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.
प्रगतशिल शेतकरी असलेले व बांधकाम व्यवसायात प्रसिद्ध असलेले नितिन जगताप हे बारामती तालुक्यातील एक उद्योजक म्हणून नावारूपाला आले आहेत. बारामती येथे उत्कर्ष प्रा. लि. नावाची त्यांची नावाजलेली कन्स्ट्रक्शन कंपनी आहे शिवाय ते सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू शिलेदार म्हणून ते ओळखले जातात.त्यांची संचालकपदी वर्णी लागल्याने त्यांच्या अनुभवाचा फायदा कारखान्याला होणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संचालक म्हणून काम करण्याची संधी दिली असून शेतकरी हितासाठी सदैव तत्पर राहु असे निवडीनंतर नितीन जगताप यांनी सांगितले.
