June 30, 2025 9:31 pm

हा भिमसेन बापुजी मोरे सार्वजनिक मित्र मंडळाचं वाटोळं करून स्वत:ही जेलमधे जाणार !

अपनी भाषा में पढ़े! Translate

हा भिमसेन बापुजी मोरे सार्वजनिक मित्र मंडळाचं वाटोळं करून स्वत:ही जेलमधे जाणार !

उल्हासनगर-४ लालचक्की परिसरात १९८० पासून सार्वजनिक मित्र मंडळ ही सेवाभावी संस्था कार्यरत आहे.
दिवंगत जयंत देशपांडे व त्यांच्या सहकार्यांनी स्थापन केलेली ही संस्था सुरळीतपणे कार्यरत होती.२००९ साली विलास जयंत देशपांडे यांची अध्यक्ष पदी निवड झाली असता त्यांनी या पुर्वीच्या कार्यकारिणीने १९८० पासून २००९ पर्यंत धर्मदाय आयुक्तांकडे फेरफार अर्ज दाखल करून त्यास मंजूरी घेतली नसल्याचे लक्षात येताच २००९ साली धर्मदाय आयुक्तांकडे रितसर फेरफार अर्ज सादर करून धर्मदाय आयुक्तांकडून
२०१३ साली त्यास मान्यता मिळवली व परिशिष्ट १ ही मंजूर करून घेतले. त्यात मंडळाचे २१ सदस्य अधिकृत असल्याची नोंद आहे. दरम्यानच्या काळात २०१३ ते २०२२ पर्यंत मंडळाचे कार्य २००९ च्या कार्यकारिणीच्या वतीने सुरळीत सुरू असल्याने तिच कार्यकारिणी कार्यरत राहिली. त्यात भिमसेन मोरे जे माजी नगरसेवकही होते ते सरचिटणीस पदी होते. सदर कार्यकारिणीची मुदत २०१२ साली संपली होती व त्या नंतर निवडणूकच न झाल्याने फेरफार अर्ज सादर केले गेले नाहीत मात्र ते तांत्रिकदृष्ट्या चुकिचे होते.
गेल्या वर्षी ९ एप्रिल २०२२ रोजी भिमसेन मोरे याने वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवली होती. त्यावेळी काढलेल्या नोटीसीत अनेक तृटी होत्या.तसेच कार्यकारी मंडळाची निवडणूक घेण्यासाठी जी आवश्यक प्रक्रिया आवश्यक असते ती प्रकिया न राबवता निवड करण्याचे ठरवले. या वेळी मंडळाचे अधिकृत सदस्य नसलेले अनेक लोक सभेत सहभागी झाले होते. या सर्व गैरव्यवहारास मी त्याच सभेत दि.९ एप्रिल २०२२ रोजी लेखी आक्षेप घेऊन मागिल सभेचे इतिवृत्त मंजूर करणे, मागील आर्थिक वर्षांचे ताळेबंद (Audited Repor) मंजूर करणे, निवडणुकीसाठी इच्छुकांचे अर्ज मागवणे आदी बाबी टाळून थेट आवाजी मतदानाने व अनधिकृत व्यक्तिंच्या मदतीने नवीन कार्यकारिणी निवडण्याच्या प्रयत्नास विरोध केला असता त्यास जुमानले नाही म्हणून माझ्यासह विलास देशपांडे, शरद माने , प्रफुल्ल भोसले आदी सदस्यांनी निषेध करून सभा त्याग केला. माझ्या लेखी आक्षेपाची पूर्तता करून ८ दिवसांनंतर रितसर निवडणुक घेता आली असती परंतू भिमसेन मोरे याने अट्टाहासाने व पुर्वनियोजित योजने प्रमाणे आवाजी मतदान घेऊन परस्पर निवड करून टाकली.
या नंतर महेश शिंदे, ज्याची वरील सभेत अध्यक्ष म्हणून निवड झाल्याचे दर्शवण्यात आले, त्याच्यावतीने धर्मदाय आयुक्तांकडे फेरफार अर्ज दाखल केला.या फेरफार अर्जास २० पैकी माझ्यासह अन्य १३ सदस्यांनी आक्षेप घेतला. आमचे म्हणणे इतकेच होते की, हा फेरफार अर्ज अवैध असून त्यात अनेक त्रूटी असल्याने तो मागे घ्यावा व पुन्हा सर्वसाधारण सभेचे आयोजन करून मागिल सभेचे इतिवृत्त व जमा खर्चास मान्यता घेऊन अधिकृत सदस्यांतून सर्वानुमते नवीन कार्यकारिणी निवडून तो फेरफार अर्ज धर्मदाय आयुक्त कार्यालयात सादर केल्यास आमची हरकत आपोआप रद्द होऊन फेरफार अर्ज मंजूर होऊन मंडळाचे कार्य सुरळीतपणे सुरू राहिल.
यावर भिमसेन बापुजी मोरे याने हेकेखोर भुमिका घेतली व सामंज्यसाचा प्रस्ताव जो बापु राजे, राजेंद्र मदास,महेश शिंदे,सुनिल चिखलकर आदींनाही मान्य होता तो फेटाळून आपली मनमानी सुरूच ठेवली. इतकेच नव्हे तर त्यासाठी मंडळात लोकांनी देणगी वर्गणीरूपाने दिलेले पैसे वकिल व इतर कारणांसाठी खर्च केले जात आहेत. या उलट मी गेले वर्षभर माझे पैसे खर्च करीत आहे व वकिल न नेमता स्वत:च मंडळाची बाजू मांडून बचाव करीत आहे. चुकीचा फेरफार अर्ज सादर करणा-यांनी नैतिक जबाबदारी म्हणून हा खर्च स्वत: करायला हवा होता.तसेच गेले सव्वा वर्ष मान्यता नसलेली कार्यकारिणीच्या वतीने भिमसेन मोरे हे खुर्च्या खरेदी, रंगरंगोटी,दुरूस्ती व प्रवास खर्च, वकिलाची फि यावर वारेमाप खर्च करीत आहे.त्याच्या आर्थिक गैरव्यवहारांची दोन प्रकरणं याआधीच उघडकीस आली आहेत.
धर्मदाय आयुक्तांकडे हे प्रकरण सुरू असून गेले सव्वा वर्ष मी सत्य बाजू मांडत आहे. भिमसेन मोरे हा मात्र स्वत:चा अहंकार पोसण्यासाठी इतर ज्येष्ठ सदस्यांना वेठीस धरत आहे. भिमसेन मोरे याने गेल्या वर्षभरात धर्मदाय आयुक्तांना अनेक खोटी व बनावट कागदपत्रं सादर करून बनवेगिरी व फसवणुक करून धर्मदाय आयुक्तांचा अवमान केलेला आहे. मनमानी पद्धतीने अहवाल बनवणे, नवीन नवीन मजकूर घुसडणे, खोटी विधानं करणे, बनावट कागदपत्रं सादर करणे असे गंभीर फौजदारी गुन्हे केले असून काल देखील त्याने एक जुना बनावट ठराव धर्मदाय आयुक्तांना सादर केला असता तो धर्मदाय आयुक्तांच्या लक्षात आलेला आहे. मिनिट्स बुकमध्ये खाडाखोड, घुसवाघुसवी पानंच्या पान फाडणे असे अनेक फ्रॉड केले आहेत. त्याबद्धल त्याला दंड व ३ ते ७ वर्षाचा कारावास होऊ शकतो. हे मी जबाबदारीने सांगत आहे.
भिमसेन मोरे वर जी कायदेशीर कारवाई होईल त्याचे मलाच नव्हे तर कोणालाही वाईट वाटणार नाही. परंतू भिमसेन मोरे याच्या मुर्खपणामुळे सार्वजनिक मित्र मंडळाची मान्यता रद्द होऊ शकते, प्रशासक नेमला जाऊ शकतो, याची पुर्वसूचना मंडळाच्या सदस्य व हितचिंतकांना देणे सल्लागार या नात्याने देणे हे माझे कर्तव्य आहे.कारण मी भिमसेन मोरे याची बनवाबनवी व खोटारडेपणा गेल्या वेळीच सिद्ध केला आहे.
माझे हे वैशिष्ट्य आहे की मी खोटेपणा खपवून घेत नाही व एकदा एखाद्याच्या मागे लागलो तर मग त्याचा शेवट करेपर्यंत थांबत नाही. मग तो मुख्यमंत्री असो खासदार असो आमदार असो महापौर असो की आयुक्त वा कोणी बडा अधिकारी. मी जे.एन.थदानी या उपमुख्याधिकारीस १९९५ साली घरचा रस्ता दाखवला होता.तथाकथित शिक्षण महर्षी शिवाजीराव कटाळे व त्यांच्या मुख्याध्यापिकेस जेल कस्टडीची हवा खायला १९८७ साली पाठवले होते.जमील खान डॉन याला १० महिने एमपीडीए खाली जेलवारी करायला लावले होते. नुकतेच युवराज भदाणे व दीपाली पवार यांना बडतर्फ करायला लावले. आत्ता माझ्या रडारवर, प्रकाश मुळ्ये, नगर रचनाकार, प्रियंका राजपुत, उपायुक्त मालमत्ता कर, सहाय्यक आयुक्त व प्रभाग समिती ४चे अधिकारी तसेच पोलीस निरिक्षक व महावितरणचे अधिकारी आहेत.
तेव्हा भिमसेन बापुजी मोरे याला बनवेगिरी,फसवणुक व बेअबदीच्या गुन्ह्यात शिक्षा देण्यास न्यायव्यवस्थेस भाग पाडण्याची जबाबदारी माझी आहे. सार्वजनिक मित्र मंडळाच्या सदस्यांनी व हितचिंतकांनी पुढील अनर्थ टाळण्यासाठी पुढाकार घ्यावा काही विपरीत निर्णय येऊन मंडळाची मान्यता रद्द झाल्यास व प्रशासक नेमला गेल्यास भिमसेन मोरे व त्याला साथ देणारेच जबाबदार असतील, याची जाहिर नोंद घ्यावी.
दिलीप मालवणकर
९८२२९०२४७०
सल्लागार
सार्वजनिक मित्र मंडळ

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!