June 29, 2025 11:00 am

प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांनी जळगाव जिल्ह्यासाठी आज सायं 7.30 वा. पुढील 3 तास कालावधीत रेड अलर्ट घोषित केले आहे.

अपनी भाषा में पढ़े! Translate

प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांनी जळगाव जिल्ह्यासाठी आज सायं 7.30 वा. पुढील 3 तास कालावधीत रेड अलर्ट घोषित केले आहे.

नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे.

जळगाव – प्रादेशीक हवामान विभाग, मुंबई यांनी दिनांक 07/09/2022 रोजी सायं 07.30 वाजता दिलेल्या सतर्कतेच्या इशा-यानुसार जळगाव जिल्हयासाठी रेड अलर्ट जारी केलेला आहे. (सदरचा रेड अलर्ट पुढील तीन तासासाठी मर्यादीत आहे. प्रादेशीक हवामान विभाग, मुंबई यांच्याद्वारा प्राप्त इशारा कळविण्यात येईल.) जिल्हयात ताशी 40 ते 50 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.

या गोष्टी करा :

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळया जागेत असाल

आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा असेल तर मोकळया जागेत जाऊन गुढव्यात डोके घालून बसावे. • आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रम घ्या. घराच्या बाल्कनी, छत

अथवा घराबाहेरील ओटयांवर थांबू नये. आपण घरात असाल आणि घरातील उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरीत बंद करावे.

• तारांचे कुंपन, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तुंपासून दुर रहावे.

पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडावे.

या गोष्टी करु नका:

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करु नका. शॉवरखाली अंबोळ

करु नका घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाईन यांना स्पर्श करु नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करु नये.

विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असतांना लोखंडी धातुच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेवू नये.

उंच झाडाच्या खाली आसरा घेवू नये. धातूंच्या उंच मनो-याजवळ उभे राहु नये.

जर आपण घरात असाल तर उघडया दारातून अथवा खिडकीतून वीज पडतांना पाहू नये. हे बाहेर

थंबण्याइतकेच धोकादायक आहे.

मा. जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या निर्देशानुसार.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!