June 29, 2025 10:52 am

जुईकर गेल्या म्हणून जल्लोष करणारे राजपुत बाबत गप्प का ?

अपनी भाषा में पढ़े! Translate

जुईकर गेल्या म्हणून जल्लोष करणारे राजपुत बाबत गप्प का ?
अजिबो गरीब नवाज आयुक्त साहेब, कसेही वागा येथे बडवे, भडवे व भाटांची कमतरता नाही
उल्हासनगर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ.करूणा जुईकर यांची मुदतवाढ न मिळाल्याचा कारणाने शासकिय निकषांनुसार बदली झाली.ही बदली आज ना उद्या होणारच होती. स्वत:ला कंत्राटी कामगारांचे नेते सिद्ध करण्याच्या हव्यासापोटी कायद्याच्या रक्षकांनी (?) करूणा जुईकर यांच्या बदलीची मागणी केली व ती नियमात बसत असल्याने अमलातही आली. कावळा बसायला व फांदी तुटायला ! अशी यांची गत झाली. मात्र श्रेयवादास सोकावलेले हे चळवळे कशाचेही श्रेय घ्यायला आसूसलेले असतात.
करूणा जुईकर यांच्या कार्यपद्धतीचे वा त्या धुतळ्या तांदळासारख्या स्वच्छ होत्या हे म्हणण्याचे धाडस कोणीही करणार नाही. मंत्रालयातून आलेला कोणताही अधिकारी असो, तो महापालिकेत समाजसेवा करायला येतो असे म्हणण्याचे कोणीही धाडस करणार नाही.अगदी कायद्याने वागाचा सल्ला देणारेही नाही. उल्हासनगर महापालिका ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी असे समजूनच येथे सर्व अधिकारी धाव घेतात. तेथे एकट्या करूणा जुईकर यांना टार्गेट करणे हा मुर्खपणा आहे.
महापालिकेतील एकतरी अधिकारी मी नाही त्यातला, मी हरिश्चंद्राचा अवतार असे आपल्या कुलदेवतेस, परमेश्वरास वा अल्लाला स्मरून सांगू शकत नाही. येथे सेवानिवृत्तीस आलेले अधिकारी अखेरचा हात व ताव मारण्यासाठी येतात. त्यात अच्युत हांगे व विद्यमान आयुक्त अजिबो गरीब शेख यांचाही समावेश आहे. राजेंद्र निंबाळकर यांच्या काळात का कमी घोटाळे झाले ? सद्या जे अधिकारी कार्यरत आहेत ते अगदी मिस्टर क्लिन आहेत का ? मग करूणा जुईकर यांची बदली झाली म्हणून स्वत:ची पाठ थोपटून घेणारे व आरती ओवाळून घेणारे श्रेयवादी वळवळे आहेत, असे म्हटले तर त्यात काय वावगे आहे ?
महाबदमाश व बलात्काराचा आरोपी युवराज भदाणे विरोधातील आंदोलनात ५ वर्षात एकदाही हे सुपारीबाज चळवळे फिरकले नाहीत.युवराज भदाणे याला काय द्या नि कसेही वागा ! अशी सुट होती का ? डस्टबीन घोटाळ्याच्या आंदोलनाच्या वेळी हे चळवळे कोणत्या बिळात लपुन बसले होते, चिक्की घोटाळ्याच्या वेळी हे चळवळे कसल्या चिक्क्या चघळत होते ? व्हिटीसी मैदान सुशोभिकरण घोटाळा, फुटबॉल स्पर्धा घोटाळ्याच्या वेळी हे कोणा भोवती पिंगा घालत होते ? महिला बाल कल्याण समितीतील शैक्षणिक साहित्य खरेदी घोटाळा, डस्टबिन घोटाळा व संगणक घोटाळ्याच्या वेळी हे चळवळे कुठे गायब झाले होते ?
जुईकर यांची बदली झाली म्हणून स्वत:ला शेंदूर फासून देवत्व बहाल करणारे चळवळे भदाणेच्या बलात्कार प्रकरणी शेपुट घालून बसतात, प्रियंका राजपुतच्या मालमत्ता कर घोटाळ्यांबाबत, मतदार जागृतीच्या सिद्ध झालेल्या घोटाळ्यांवर चिडीचुप बसतात. रमेश चव्हाणची लाईट चोरी, मालमत्ता कर चोरी, बेकायेशीर बंगला, सुशिल पवारच्या पत्नीची बोगस सफाई कामगार म्हणून झालेली नियुक्ती याबाबत अवाक्षर काढत नाहीत. एक करूणा जुईकरच या सुपारीबाजांना दिसते.
याचे मला आश्चर्य वाटत नाही.
आमचे विद्यमान आयुक्त अजिबो गरीब नवाज शेख आहेत. ते प्रियंका राजपुतचे फॅन असल्याप्रमाणे मॅडमना फेवर करीत आहेत.त्यांच्या वित्तीय अनियमिततेवर निलंबनाची कारवाई करण्यासाठी त्यांचा हात व “पेन” थरथरत आहे.स्टेनोचा सहा्यक आयुक्त झालेला गणेश शिंपी त्यांना दिसत नाही, मालमत्ता विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचार दिसत नाही. नगर रचना विभागात गेले १५ महिने काम करणारे बोगस कर्मचारी आयुकतांना दिसले नाहीत, मुळव्याधीचे ऑपरेशन करण्याऐवजी आयुक्त त्याची मलमपट्टी करीत आहेत.
बगळ्यासारखे ढोंगी चळवळे व निष्क्रिय ( गावरान भाषेत षंढ म्हणतात परंतू मी तसे म्हणणार नाही ) आयुक्त हेच ख-या अर्थाने उल्हासनगरचे शत्रू आहेत. आयुक्तांना पूर्ण क्षमतेने काम करणे जमत नसेल तर त्यांनी सन्मानाने मुदतपूर्व सेवानिवृत्ती घ्यावी किंवा दीर्घ रजेवर जावे परंतू अशी मिंधेगिरी करत दिवस ढकलत पाट्या टाकत निवृत्तीची वाट पाहू नये. जाता जाता बदनामीचा कलंक घेऊन जायचे असेल तर कसेही वागा,तुमचे उदात्तीकरण करण्यासाठी भाट,बडवे व भडव्यांची उल्हासनगरम़ध्ये कमतरता भासणार नाही.
दिलीप मालवणकर
९८२२९०२४७०
ज्येष्ठ पत्रकार
अध्यक्ष
अन्याय विरोधी संघर्ष समिती

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!