सिंगोरी येथे शिक्षक दिन साजरा.
रजत डेकाटे // प्रतिनिधी नागपूर ✍️
मौदा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या सिंगोरी येथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावेळी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
सिंगोरी येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी शालेय स्वयंम प्रशासन चालविले. यावेळी जि. प.शाळेत कार्यरत असलेले शिक्षक श्री. राजु नवनागे सर यांना सरपंच टेकाम यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी सरपंच अजाबराव टेकाम यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. व मुलांना खाऊ वाटप करण्यात आला.
यावेळी अजाबराव टेकाम सरपंच गट ग्रामपंचायत नरसाळा, निलकंठ कुंभलकर(माजीसरपंच), दिलीपजी वैद्य (शा.व्य.स.अध्यक्ष)अश्विनी वैद्य,श्रीमती पार्वताताई वैद्य अंगणवाडी सेविका ,स्वप्निल वैद्य सिंगोरी येथील शाळेतील विद्यार्थी बालमित्रांनी व गावातील नागरिक यावेळी उपस्थित होते. अशाप्रकारे कार्यक्रम संपन्न झाला.