June 30, 2025 9:15 pm

सकल मराठा समाजाने आवाहन केलेल्या बारामती बंद ला माळेगाव मध्ये मोठा प्रतिसाद…

अपनी भाषा में पढ़े! Translate

सकल मराठा समाजाने आवाहन केलेल्या बारामती बंद ला माळेगाव मध्ये मोठा प्रतिसाद…

बारामती… सह-संपादक – संदिप आढाव

जालना येथील घटनेच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाने बारामती बंदला माळेगावकरांनी सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळला.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषण सुरू होते.या उपोषणकर्त्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला.यामुळे संपूर्ण मराठा समाजात संतापाची लाट उसळली असून मराठा समाजाने बारामती शहर व तालुका बंदची हाक दिली होती.
‌या बंदला माळेगावकरांनी आपले सर्व व्यवसाय दिवसभर बंद ठेवले होते.मुख्यबाजारपेठ,भाजी मंडई,फळविक्रेते,कापड दुकान,सराफी पेढी, हॉटेल व इतर छोट्या व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली होती.तसेच सतत गजबजलेला राजहंस चौक,शनी मंदिर, कॉलेज परिसरात शुकशुकाट होता.तर वहातुक बंद असल्याने सतत वर्दळीचा निरा -बारामती रस्ता ओस पडला होता.
दरम्यान माळेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत बंद काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस निरीक्षक किरण अवचर, उपनिरीक्षक देवीदास साळवे सहायक फौजदार विजय जगताप, पोलीस नाईक धनंजय गाढवे पाटील, राजु शिंदे,व इतर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता…

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!