July 1, 2025 1:28 am

आज करमाळा येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत निघणार खोलेश्वर महादेवाच्या रथाची मिरवणुक

अपनी भाषा में पढ़े! Translate

करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :-श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवार म्हणजे आज ०४/०९/२०२३ रोजी दु.१२.०० श्री खोलेश्वर महादेवाची रथामध्ये सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात येते. हा रथ पूर्ण सागवानी लाकडाचा असून अतिशय सुबक पणे त्याची रचना केली आहे. त्याच्यावरील नक्षीकाम श्री देवीचा माळ येथील कमलाभवानी देवीच्या मंदिरा मधील दगडी रथ एक सारखे असल्याचे दिसून येते. या रथाची खोलेश्वर आरती मंडळाच्या वतीने मिरवणूक काढली जाते. हजारो भाविकांच्या उस्थितीत हा नेत्र दिपक सोहळा पाहण्यासारखा असतो.

करमाळा शहराच्या वैभवात भर टाकणारे अनेक पुरातन पेशवेकालीन मंदिरे राजे रावरंभा निंबाळकर यांच्या कारकिर्दीत उभारण्यात आली आहेत. त्यापैकी शहरातील किल्ला वेस येथील महादेवाची भव्य आखीव रेखीव खोलेश्वर मंदीर आहे. या मंदिरात दर सोमवारी अनेक भाविक दर्शनासाठी येतात.
तसेच वर्षा मध्ये अनेकवेळा धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

करमाळा शहरातील नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरातील नंदीची मिरवणूक माघ शुद्ध महिन्यातील महाशिवरात्री नंतर येणार्‍या पाहिल्या गुरुवारी निघते. तसेच कोष्टी समाजाच्या वतीने या ठिकाणी श्रावण महिन्यात शिवनाम सप्ताहाचे आयोजन परंपरेत नुसार अनेक वर्षा पासुन करण्यात येत आहे. हळद कुंकू अर्पण केल्यामुळे मूर्तीची झीज झाली होती त्यामुळे आरती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पिंडी सारखं चांदीचा मुकुट बसविलेला आहे. तसेच श्री देवीचा माळ येथील विष्णु मूर्ती वेशीतील महादेवाची पिंड व किल्ल्यातील श्री गणेश मूर्ती या येकच दगडाच्या बनविण्यात आले आहे असे सांगण्यात येते. बांधकामाची रचना मंदिरातील खांब हे श्री देवीचा माळ येथील मंदिर रचणे प्रमाणे दिसून येते या वेशीमध्ये महादेवाबरोबरच ब्रह्मा विष्णु अशी वेगवेगळी मंदिर आहे गेल्या पंधरा वर्षांपासून शहरात काही तरुणांनी खोलेश्वर मंदिराचे पुजारी नागेश गुरव यांच्यासह मिळून श्री खोलेश्वर आरती मंडळाची स्थापना केली आहे. लोकसहभागातुन शहरातील लोकांच्या वर्गणीतुन मंदीराचे कार्यक्रम संप्पन होत आहेत. यामधील अनेक युवक धार्मिक कार्यक्रमासाठी योगदान देतात. दैनंदिनी आरती वेळी भक्त गण मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!