जालना येथील निषेधार्थ रिधोरे येथे रस्ता रोको आंदोलन
प्रतिनिधी आजिनाथ कनिचे
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या सकल मराठा समाज अंतरवली सराठी जिल्हा जालनाजालना येथे मराठा समाजाच्या उपोषणकर्त्यावर केलेल्या लाटी चार्ज हल्ल्याच्या घटनेचे निषेध व्यक्त करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने रिधोरे येथे भव्य रस्ता रोकोचे आयोजन करण्यात आले होते,
याबाबतीत सविस्तर वृत्तांत असा की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी शांततेच्या मार्गाने आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारी,लहान मुले, वृद्ध महिला अंतरवाली सराटी जिल्हा जालना येथे तेथील पोलीस प्रशासनाने अमानुषपणे लाठीचार्ज हल्ला केला या घटनेचे सर्व राज्यभर पडसाद उमटत असताना त्याचाच एक भाग म्हणून रिधोरे ,तालुका माढा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य असे रास्ता रोकोचे आयोजन करण्यात आले होते ,यावेळी सर्वपक्षीय मराठा समाज बांधवांची संख्या लक्षणीय होती ,रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांची दोन दोन किलोमीटर रंग लागलेली होती ,यावेळी उर्मिला शिंदे माजी सरपंच रिधोरे, स्वाती महाडिक ,सुवर्णा शिवपुरे राष्ट्रवादी महिला आघाडी, शीला इंगळे ,मनीषा गायकवाड इत्यादीमहिलांनी सहभाग घेतला,
यावेळी प्रास्ताविक व सूत्रसंचालन अतुल गवळी यांनी केली ,संभाजी ब्रिगेडचे शांतीलाल गवळी, दिगंबर गवळी, बापू मेजर, अमोल उबाळे, आबा गायकवाड ,सत्यवान गायकवाड ,आजिनाथ बापू परबत इत्यादींनीभविष्यकाळात असे घटना घडू नये आणि घडल्यास त्याचे गंभीर परिणाम प्रशासनाला भोगावे लागतील असे मनोगत व्यक्त केले ,यावेळी उपोषणकर्त्यावर झालेल्या लाटी हल्ल्याची निपक्षपतीपणी चौकशी करून संबंधित एस पी तुषार दोशी यांना निलंबित करावे,
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावी,
सारथी योजनेच्या लाभार्थ्यांना शैक्षणिक अनुदान उपलब्ध करून देण्यात यावी,
आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाला भरघोस प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात यावा इत्यादी मागण्यांचे निवेदन महिलांच्या हस्ते मंडलाधिकारी सूर्यकांत डिकोळे व कुर्डूवाडी पोलीस स्टेशनचे अधिकारी वाघमारे साहेब यांना निवेदन देण्यात आले,
यावेळी लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्षआनंद हनवते आणि सुनील कसबे तालुका अध्यक्ष यांनी या आंदोलनासाठी पाठिंबाचे पत्र दिले.